आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divyanshu Ganatra Managing Partner, Yello Brick Road

प्रेरणादायी: वयाच्या 19 व्या वर्षी दृष्टी गमावली, देशातील पहिले दृष्टिहीन पॅराग्लायडर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यांशू गणात्रा : मॅनेजिंग पार्टनर, यलो ब्रिक रोड
वय: 38 वर्षे, पुण्यात जन्म
शिक्षण : पुणे विद्यापीठात एमए, क्लिनिकल सायकॉलॉजीत पदवी, संगणक प्रशिक्षित

का चर्चेत- एकट्याने पॅराग्लायडिंगचा विक्रम. त्यांनी नुकतेच 600 फूट उंचीवर पॅराग्लायडिंग केले आहे.

वयाच्या 17 व्या वर्षी ग्लुकोमामुळे दिव्यांशूची दृष्टी पुसट होऊ लागली होती. 19 व्या वर्षी एक दिवस सकाळी जाग आली. मात्र त्यानंतर जगात त्यांच्यासाठी केवळ अंधकारच होता. दृष्टी संपूर्ण गेली होती. दिव्यांशू नैराश्येच्या गर्तेत गेला. मात्र लवकरच त्याने नैराश्यावर मात केली. स्वत:ला सक्रिय ठेवण्यासाठी पुण्याच्या पुनर्वसन केंद्रात प्रवेश घेतला. येथे त्यांना खडू व केनचे फर्निचर बनवण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे पर्याय दिले गेले. टेलिफोन ऑपरेटर हा पण पर्याय होता. त्याला हे पर्याय अमान्य होते.

त्याला जगाला जाणण्याची इच्छा होती. त्याने संगणकाचे प्रशिक्षण घेतले. स्वत:चे इन्स्टिट्यूट काढले. दृष्टिहीनांना संगणकाचे प्रशिक्षण देऊ लागला. दरम्यान, नव्या गोष्टी शिक ण्याचे आव्हान स्वीकारले. पुणे विद्यापीठाच्या क्लिनिकल सायकॉलॉजी विभागात एमए पूर्ण केले. त्यानंतर चांगली नोकरी केली.

साहसी खेळांत रूची असल्याने कामशेतस्थित टेंपलपायलट पॅराग्लायडिंग संस्थेत प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. पाच दिवसांच्या प्रशिक्षणात पहिल्या 3 दिवसांत दिव्यांशूने लँडिंग ग्राउंड, ग्लायडर यांना स्पर्शाने जाणले. तसेच सूचनांना ऐकून त्याप्रमाणे कृती केली. उड्डाणाच्या पाचव्या दिवशी हवामान प्रतिकूल होते. थोडीही हवा नव्हती. मात्र दिव्यांशूने उड्डाणाचा निर्णय घेतला. समुद्र सपाटीपासून 600 फूट उंचावर तो ट्रेनरच्या रेडिओ सूचना ऐकत होता. ए, व्ही. मलिक हे त्याचे प्रशिक्षक. उड्डाण यशस्वी झाले. हवेतून जमिनीवर आल्यावर दिव्यांशू म्हणाला, पॅराग्लायडिंग केली तेव्हा सवोच्च स्थानी असल्यासारखे भासले.