आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हर्षोल्लासाचा झगमगाट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज काश्मीरमध्ये येणा-या पर्यटकांना 50% सवलत
जम्मू- काश्मीरला जाणा-या पर्यटकांसाठी दिवाळी ऑफर आहे. या सणानिमित्त या राज्यात येणा-या प्रत्येक पर्यटकाला हॉटेल्स आणि प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत दिली जाईल. सरकारी आणि खासगी अशा दोन्ही कंपन्यांनी ही ऑफर देऊ केली आहे.

वृंदावनमध्ये शंभर वर्षांनंतर आगळीवेगळी दिवाळी
वृंदावनमधील पाच विधवा आश्रमांमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेले काळोखाचे राज्य या वेळी दूर होणार आहे. या आश्रमात कोणताही सण साजरा केला जात नव्हता. मात्र, या वेळी हे आश्रम हजारो दिव्यांनी लख्ख उजळून निघणार आहेत.

शिवकाशीत पक्ष्यांसाठी फटाके फुटणार नाहीत, फक्त दिवे पेटणार
देशाची फटाक्यांची 90 टक्के मागणी तामिळनाडूतील शिवकाशी पूर्ण करते. मात्र, याच शिवकाशीतील शंकरापंडियापुरम परिसरातील नागरिकांनी या वर्षी फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे येणा-या पाहुण्या पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून ते फक्त दिवे पेटवून दिवाळी साजरी करणार आहेत.


रामचरितमानसमधून...
सुमन बृष्टि नभ संकुल भवन चले सुखकंद।
चढी अटारिन्ह देखहिं नगर नारि नर बृंद ।।
अर्थात, अयोध्येला परतल्यानंतर प्रभू श्रीराम आपल्या महालाकडे जायला निघाले तेव्हा पुष्पवृष्टीने आसमंत भरून गेला होता. नगरीतील लोक माळ्यावर चढून त्यांचे दर्शन घेत आहेत.

एक नज्म...

रोशन हे कायनात दीवाली की रात है
उल्फत के दीप में जलाओ तो बात है
दिली तिजोरियों में रहे प्यार की दौलत
बढती है बाँट कर बहुत, ये वो सौगात है।

आणि पोएट्री.....
Who will take my work? Asks the setting Sun
No one has any answer in the whole silent world
An earthen lamp says humbly from a corner
'I will my Lord, as best as I can.'
-Ravindranath Tagore


कोलकात्यामध्ये आज
निघणार सचिनचा देखावा
दिवाळीनिमित्त कोलकात्यामध्ये सचिन तेंडुलकरच्या आठवणींशी संबंधित देखावा निघणार आहे. 6 नोव्हेंबर रोजी वेस्ट इंडीजबरोबर सुरू होणारा कसोटी सामना सचिनची 199 वी कसोटी आहे. सचिनचा क्रिकेट संन्यास संस्मरणीय करण्याचा बंगाल क्रिकेट असोसिएशनचा मानस आहे.

दोन लाख कोटींहून
जास्तीची दिवाळी, देश सज्ज...
यथेच्छ खरेदी करण्यात आली आहे. 15 हजार कोटी रुपयांची तर केवळ फटाक्यांची खरेदी झाली असावी, असा अंदाज आहे. 4500 कोटी रुपयांचे चॉकलेट्स. 36 हजार कोटी रुपयांचे कपडेलत्ते खरेदी केले जातील, असा अंदाज आहे. दस-यापासून दिवाळीपर्यंत 90 हजार कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि नाणी खरेदी करण्यात आली असल्याचा अंदाज आहे. ऑटोमोबाइल्स आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची खरेदी मिळून या सणासुदीत एकूण उलाढाल दोन लाख कोटी रुपयांहून अधिक होण्याची अपेक्षा आहे.

या नयनरम्य छायाचित्राबद्दल
हे काल्पनिक छायाचित्र नाही. नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने भारताची काही उपग्रह छायाचित्रे टिपली आहेत. भारतीय लोकसंख्येचा विस्तार पाहण्याचा त्यांचा उद्देश होता. दहा वर्षांच्या कालावधीत घेतलेली चार छायाचित्रे जोडून नासाने ती जारी केली तेव्हा अशी काहीशी छबी तयार झाली. देशाचा झगमगाट दाखवणा-या दिवाळीचे प्रतीक!