आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकांवर चर्चा करा, कोणालाही दोष देऊ नका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका नेत्याचे यश तेव्हाच आहे, जेव्हा तो आपल्या सहका-यांच्या चांगल्या कामगिरीची चर्चा करेल, त्याचबरोबर त्यांच्यातील उणिवा, दोष यासंदर्भातही माहिती देईल. जर कोणी चांगले काम केले आणि ते अधिक चांगले झाले नसेल
तरीही त्याला त्याच्या चांगल्या कामाची जाणीव करून द्यायला हवी. चुकलेली प्रत्येक गोष्ट सुधारता येऊ शकते, यासाठी कोणी चांगले काम केले तर त्याला ते अधिक चांगले कसे होईल, याबाबत सांगायला हवे. कोणतेही काम पूर्ण झाल्यावर त्यातील उणिवा किंवा चुका याविषयी सांगितले नाही तर तो व्यक्ती साधारणच राहील. तो असे समजेल की, आपण चांगलेच काम करतो. अपेक्षेपेक्षा कमी चांगले काम करणा-या व्यक्तीला प्रतिसाद अर्थात फिडबॅक देण्याची गरज आहे. कोणतेही काम करताना चुका दाखविल्याशिवाय त्यात सुधारणा होणार नाही. यासाठी आपल्याबरोबर काम करणा-या सहका-यांना प्रोत्साहित करा. त्यांना प्रतिष्ठा मिळवून द्या आणि चांगल्या प्रकारे काम कसे करता येईल, याचा मार्ग दाखवा. जे काम केले आहे, ते अजून अधिक चांगल्याप्रकारे कसे करता आले असते, यातील फरक त्याला सांगा. आपले डोके दुखत असेल तर आपण डोके बाजूला काढून ठेवत नाही. डोके दुखी बरी होण्यासाठी उपाय करतो. तशीच चुकांबद्दल चर्चा व्हायला हवी, परंतु सहका-याला तो चुकीची व्यक्ती आहे, असे सांगू नका. त्याला तो चांगली व्यक्ती आहे, असेच नेहमी सांगा. त्याला वाईट सवयी सोडण्यासाठी मदत करा.
सहकारी अपयशी ठरला तरी त्याला अपयशातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी. तो एखाद्या कामात अपयशी ठरला तर त्याचा अर्थ असा नाही की, तो कधीच यशस्वी होणार नाही. कामगिरी प्रत्येक व्यक्ती करत असतो परंतु चांगल्या कामगिरीला प्रोत्साहन दिले पाहिजे. तुम्ही त्याला प्रोत्साहित केले तर त्यात सुधारणा दिसतील. एखाद्याच्या चुकांवर टीका करा, परंतु त्या व्यक्तीचे मात्र कौतुकही करा.
पेंटिंग करणा-याला असेच वाटले पाहिजे की तुम्ही त्याची प्रशंसाच करत आहात. त्याचबरोबर त्याला हेही सांगा ही पेंटिंग अजून चांगली झाली असती. याचप्रमाणे आपल्या पाल्याला हे सांगायला हवे की, त्यात मोठ्या क्षमता लपलेल्या आहेत. त्याने आपली कामगिरी अधिक चांगली करावी. त्याला प्रोत्साहित करण्याची एकही संधी सोडायला नको. तसेच त्याच्या चुका सांगण्यासही विसरू नये.
एकदा माझ्या वरिष्ठांनी मला सांगितले की, तुम्ही अतिशय चांगले काम करतात. कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी कठीण नाही. जेव्हाही मी माझे काम पूर्ण करून घेत असे, तेव्हा तुमचे लक्ष्य पूर्ण झाल्याचे ते सांगत असत. त्यामुळे माझी कामगिरी नेहमीच अधिक सुधारत गेली. त्यामुळेच मी आज स्वत:च्या नजरेत अधिक चांगला झालो असून माझी कामगिरीही सातत्याने सुधारत आहे.