आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरने खरेदी केली बँक, उद्योगपती भाऊही बँक परवान्याच्या प्रतीक्षेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चर्चेत असण्याचे कारण- त्यांनी नुकतीच युरोपमध्ये एक बँक खरेदी केली.
मुंबईच्या कुर्ला परिसरातील अट्टल दारुड्या नीलेश भैसाडेचे लिव्हर पूर्णपणे खराब झाले. तेव्हा त्याची बहीण निशा वाणी हिने तिच्या लिव्हरचा काही भाग दान करून त्याचे प्राण वाचवले. ही शस्त्रक्रिया फारच जटील होती; पण लंडनहून आलेल्या डॉ. संजीव कनेरिया यांनी ती यशस्वीपणे पूर्ण केली. हिरानंदानी रुग्णालयात 16 तास चाललेली ही शस्त्रक्रिया रक्षाबंधनाच्या दिवशी करण्यात आली होती. आपल्या रुग्णांसाठी डॉ. कनेरिया नेहमी मुंबईला येत असतात.
1988 मध्ये कोलकात्याच्या आरजी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस करताना त्यांचा मोठा भाऊ हेमंत वडिलांनी सुरू केलेल्या गिरणीबरोबर दुसरा व्यवसाय सुरू करत होते. विद्यावेतन मिळाल्याने संजीव लंडनला गेले. जेव्हा ते डॉक्टरी पेशात आले तेव्हा आपल्या भावांप्रमाणे आपणही उद्योगपती बनू आणि एका बँकेचे मालक असू याची त्यांना कल्पनाही नव्हती. हेमंतनेही सध्या रिझर्व्ह बँकेत बँकेच्या परवान्यासाठी अर्ज केला आहे, हाही एक योगायोग आहे. हेमंत म्हणजेच एसआरईआय समूहाचे संस्थापक.
संजीव यांनी इंग्लंडमध्ये जेव्हा पत्नी संगीताबरोबर अदविनिया हेल्थकेअर सुरू केले तेव्हा त्यांचा कामाचा व्याप वाढू लागला. आज येथे हजार लोक काम करतात. आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठीच त्यांनी ऑस्ट्रियाची हायपो अ‍ॅल्प-अडरिया बँक एजी 556 कोटी रुपयांमध्ये विकत घेतली आहे. बँकेच्या 14 शाखा व 56 हजार ग्राहक आहेत. बँक खरेदीसाठी डॉ. संजीव यांच्याकडे काही पैसे होते, तर उर्वरित रकमेसाठी त्यांनी कर्ज काढले. त्यांच्या हेल्थकेअरच्या व्यवसायाला उंचीवर नेण्यासाठी बँकेची मोठी मदत होणार आहे. अदवानियाचे व्यवस्थापन संगीताच सांभाळतात.
कनेरिया यांचे दोन लहान भाऊही आहेत. त्यापैकी सुनील हे एसआरईआय इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सचे काम पाहतात, तर सर्वात लहान सुजित हे नवी दिल्ली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे काम करत आहेत. बँक खरेदीमध्ये इतर भावांचे काहीही योगदान नसल्याचे सुनील सांगतात. संजीव यांनी आपल्या स्वत:च्या कर्तृत्वाने सर्व काही केले आहे. या सर्वात त्यांना अनुभव कामी आला. तो त्यांनी एमबीएनंतर मॅकेंजी अँड कंपनीत कन्सल्टंट पदावर मिळवला होता.