आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुत्र्याला गोंजारणारे अस्वल नेट युजर्समध्ये लोकप्रिय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनडात कुत्र्यांचे अभयारण्य आहे. मेनिटोबा राज्यातील या अभयारण्यात पर्यटकांची येजाही मोठ्या प्रमाणावर असते. अभयारण्यात कोणत्याही कुत्र्याला पर्यटकांनी अन्नपदार्थ खाऊ घालण्यास किंवा त्यांच्यासोबत छायाचित्र घेण्यास मनाई आहे. येथे ध्रुवीय अस्वले अर्थात पोलर बिअर्सदेखील आढळतात. गेल्या आठवड्यात एक अस्वलाने कुत्र्याची शिकार केली होती.
ब्रायन लादून्स माइल -५ या कुत्र्यांच्या अभयारण्याला डेव्हिड डी मुल्स या टूर गाइडनी नुकतीच भेट गिली होती. तेथे त्यांनी ध्रुवीय अस्वलांचा आश्चर्यकारक व्हिडिओ शूट केला. कुत्रा हे त्याचे खाद्य असूनही हे अस्वल लहानग्या कुत्र्यांना गोंजारत होते. निरागस कुत्रादेखील आपल्या मातेप्रमाणे या अस्वलाकडून गोंजारून घेत होता. या दोघांमधील हे प्रेमळ दृश्य जगभरातील नेट युझर्सनी मोठ्या प्रमाणावर पसंत केले तसेच ते व्हायरलही केले. या दोघांना एकत्र पाहून डेव्हिड यांनी अभयारण्यात फेरी मारण्यासाठीची बस अचानक थांबवली होती. हे अस्वल आणखी एका कुत्र्याचा बळी घेईल, अशी भीती त्यांना होती. मात्र, थांबल्यावर त्यांना याउलट दृश्य दिसले.
- कुत्र्यांच्या या अभयारण्यात ९ ध्रुवीय अस्वले असून त्यातील दुर्मिळ प्रजातींना विशेष संरक्षण देण्यात आलेले आहे.
}Youtube.com
बातम्या आणखी आहेत...