आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहिंसावादी श्वाननिरीक्षक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल नोक-यांची मारामार चाललेली आहे. 1965-70 च्या काळात मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले की नोकरी मिळण्याची शाश्वती होती. आता एक जागा अन् पाच हजार अर्ज अशी परिस्थिती आहे. अर्ज केला की नोकरी मिळायचीच असा तो काळ होता. संबंधित जागेसाठी अर्ज करायचा अन नोकरीवर रुजू व्हायचे असा तो काळ होता. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे राहणारे आमचे एक पोतदार आडनावाचे मित्र होते. मॅट्रिक झाले आणि परभणीला नगरपालिकेत नोकरीला लागले. त्यांना पद कोणते मिळाले तर ‘श्वान निरीक्षक!’ गावात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असते. ती पिसाळली तर त्यांच्या चावण्याने रेबीज नावाचा प्राणघातक आजार होतो. तसेच अशी कुत्री माणसांच्या अंगावर धावून येतात. घरातील पाळलेल्या जनावरांना ती चावली तर तीही पिसाळतात. या सर्वांवर उपाय म्हणजे भटक्या कुत्र्यांना पकडून मारून टाकणे. त्या काळात कुत्र्यांना मारून टाकले जायचे. सुरुवातीला त्यांना हे काम जबाबदारीने पार पाडले. पण पुढे त्यांना अशा कुत्र्यांना पकडण्याचे व त्यांना मारून टाकण्याचे काम करणे अवघड वाटू लागले. हे गृहस्थ एकदम शांतताप्रिय आणि अहिंसावादी. भटक्या कुत्र्यांना दोन-तीन मदतनिसांच्या साह्याने पकडायचे, त्यांच्या शेपट्या कापून वरिष्ठांना दाखवयाच्या. किती कुत्री मारली याचा पुराव्यासह हिशेब द्यावा लागायचा. श्वानावर दया करणारे, त्यांची बाजू हिरिरीने मांडणारे अनेक जण आहेत. पण भटक्या कुत्र्यांना मारून टाकण्यासाठी कोणाची हरकत नव्हती. त्यांच्या मनात श्वानप्रेम जागे झाले. कुत्र्यांना मारण्याचे पाप करतो आहोत असे वाटू लागले. शेपटी तर कापत पण कु त्र्यांना ते सोडून देत. पण ही जबाबदारी त्यांच्या अंगलट आली. अशीच
दोन-चार शेपटी कापलेली कुत्री भांडत नगरपालिकेसमोर आली. ते संबंधित अधिका-यांनी पाहिले. दुस-या दिवसापासून त्यांचे श्वाननिरीक्षक पद गेले.