आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Domestic Violence In India, Educated Women More Affecting

सुशिक्षित महिला कौटुंबिक हिंसेच्‍या सर्वाधिक बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्‍त्री-पुरूष समानता समाजामध्‍ये आली आहे. महिला पुरूषांच्‍या खांद्याला-खांदा लावून काम करत आहेत. आज स्त्रिया कोणत्‍याच क्षेत्रात मागे नाहीत. राजकीय क्षेत्रात स्त्रियांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. या विषयांवर वारंवार चर्चा होत असली तरी स्त्रियांवरील अन्‍याय संपला आहे का, याचे सिंहावलोकन करण्‍याची खरी गरज निमार्ण झाली आहे. कारण आज समाजामध्‍ये स्त्रियांवर अन्‍याय होण्‍याचे प्रमाण वाढले आहे. कुटुंबातील व्‍यक्तिकंडून स्त्रियांवर होणा-या अन्‍यायात वारंवार भर पडत आहे. घरातील स्त्रियांबरोबर घरातील प्रौढ आणि वृध्द व्‍यक्तिनांही घरातील काही सदस्‍यांकडून अत्‍याचार केल्‍याच्‍या घटना उघडकीस आल्‍या आहेत.
घरातील व्‍यक्तिकंडून करण्‍यात आलेल्‍या अत्‍याचारचे समर्थन करणारे काही महाभाग आपल्‍या समाजात पाहायला मिळतात. आज समाजात असलेली पितृसत्ताक मानसिकता स्त्रियांवर होणा-या अन्‍यायाला खत-पाणी घालत आहे. लग्‍न झाल्‍यानंतर नव-याने पत्‍नीवर हात उचलणे, मारहान करणे यासाख्‍या गोष्‍टीचे समर्थन केले जात आहे. आपल्‍या समाजातील हूंडा पद्धतीचा शस्‍त्रासारखा वापर केला जात आहे.समाजात अशी अनेक उदाहरण पाहायला मिळतात, जिथे हूंड्यासाठी परिवारातील लोकांनी नव-या मुलीची हत्‍या केली आहे. अशा घटनेत सासु-सासरे, नणंद, दिर यांचा समावेश असल्‍याचे आढळते. आपेक्षीत पैसा, वस्‍तु, न मिळाल्‍यामुळे कित्तेक मुलींची हत्‍या करण्‍यात आली आहे.
अशा प्रकारच्‍या हूंडाबळी ठरणा-या आणि कौटुंबीक हिंसेच्‍या बळी ठरलेल्‍या अनेक स्त्रियांना आपले आयुष्‍य संपवावे लागले आहे.
एका खाजगी सामा‍जिक सं‍स्‍थेने कौटुंबीक अत्‍याचारा संदर्भात केलेल्‍या सर्वेक्षणाची आकडेवारी थक्‍क करणारी आहे. या सर्वेक्षाणाचा अहवाल सांगतो की, भारतात पाच कोटी महिलांचा कुटुंबातील व्‍यक्तिंकडून छळ केला जातो. यापैकी फक्‍त 0.1 टक्के स्त्रिया अन्‍याया विरोधात तक्रार करतात. राष्‍ट्रीय कौटुंबीक स्‍वास्‍थ सर्वेक्षणाची आकडेवारी धक्कादायक आहे. या आकडेवारीनुसार भारतात अशिक्षित महिलांपेक्षा जास्‍त अत्‍याचार सुशिक्षित महिलांवर होत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. या आकडेवारीनुसार सुशिक्षीत महिलांवर झालेला अत्‍याचार हा अशिक्षीत महिलांपेक्षा 1.54 टक्के जास्‍त आहे.­ कौटुंबीक हिंसेवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी भारत सरकारने अधिनियम 2005 हा कायदा पास केला. मात्र आजही मोठ्या प्रमाणावर कौटूंबीक अत्‍याचाराचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही.
कोणत्‍या राज्‍यात होतात महिलांवर सर्वाधिक अत्‍याचार...