आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांच्यासाठी विदेशी व्यापार ही धोक्याची घंटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
20 जानेवारीला जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतील, तेव्हा त्यांना मिळणाऱ्या हजारो विशेष अधिकारात ९-११ हल्ल्याची झळ पोहाचलेल्या लोकांनी सौदी अरब सरकारवर जे दावे दाखल केले आहेत, त्यातून सौदी सरकारला वाचविण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. या वर्षी संसदेने अध्यक्षांना विदेश निती आणि राष्ट्रीय सुरक्षा संदर्भात जे स्वातंत्र्य दिले आहे. पण ट्रम्प यांचा मामला जरा तापदायक आहे. मे महिन्यात ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांनी जेद्दा आणि सैादी अरब येथील हॉटेल बांधकामात गुंतवणूक केली आहे. एक अब्जाधीश राजकुमार,ओसामा बिन लादेनच्या वडिलांची कन्स्ट्रक्शन कंपनी सौदी बिनलादेनच्या मदतीने हॉटेलचे बांधकाम करत आहेत. अतिरेकी बनल्याानंतर ओसामाने आपल्या कुटुंबाशी संबंध तोडले होते. पण ट्रम्प यांच्या गुंतवणुकीबाबत माहिती नाही. पण हे त्यांचे पहिलेच सौदी कनेक्शन नाही. मॅनहटन, न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प वल्ड टॉवरमध्ये सौदी अरबचा शाही परिवार आणि तसेच संयुक्त राष्ट्र प्रतिनिधी मंडळाच्या अनेक सदस्य्ांची निवासस्थाने आणि कार्यालये आहेत.
याचा अर्थ असा हाेतो की, ९-११ च्या हल्ल्याची झळ पोहोचलेले लोक जर न्यायालयात जााणर असतील तर सौदी अरेबियाच्या शही परिवार ट्रम्प यांचा निधी गोठवू शकतात. यादरम्यान, २५ नोव्हेंबर रोजी वॉशिंग्टनचे वकील डॉन मेकघान यांना ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये आपला वकील म्हणून नियुक्त केले आहे. यानंतर ट्रम्प यांनी सांगितले की, ते १५ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत आपल्या उद्योगातून आपण बाजूला होणार असल्याबाबतची घोषणा करणार आहेत.
उद्योगातून पूर्णपणे बाजूला झाल्याशिवाय अमेरिका आणि विदेशातही ट्रम्प यांचे अनेक उद्योग त्यांच्या अध्यक्षपदासाठी धोका बनू शकतात. फिलिपाइन्सचे एक राजनैतिक अधिकारी मनीलामध्ये १ हजार कोटी रुपयांच्या एका प्रकल्पात ट्रम्प यांचे भागीदार आहेत. ट्रम्प यांनी १५ नोव्हेंबरला आपल्या भारतीय भागीदारांशी चर्चा केली. त्यांनी आपल्या मुलांना इतर देशातील तेथील नेत्यांशी चर्चा करण्यास सांगितले. न्यूयॉर्क टाइम्सनुसार मॅनहॅटनच्या इमारतीवर अंदाजे ६४०० कोटी रुपयांच्या कर्जातही चीनचा सहभाग आहे. या इमारतीची ३० टक्के मालकी ट्रम्प यांच्याकडे आहे. त्यांनी वचन दिले आहे की, १५ डिसेंबर रोजी उद्योगाची सुत्रे पूर्णपणे बाजूला ठेऊन देशाबद्दल विचार करू. पण ते किती प्रमाणात उद्योगातून दूर होणार हे आताच सांगणे शक्य नाही. अध्यक्ष आणि संसदेचे हीत यांची टक्कर झाली तर यात कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही. ट्रम्प यांना विदेशी भेटी आणण्यास बंदी आहे. पण आतापर्यंत कोणाविरुद्धही कारवाई नाही.
अध्यक्षांच्या टीममध्ये बँकर्स आणि अब्जाधीश
डोनाल्ड ट्रम्प आपल्या पथकात वॉल स्ट्रीटचे बँकर्स आणि अब्जाधीश यांना सामील करून घेत आहेत. अर्थखात्याचे मंत्री स्टीव्ह म्यूचिन गोल्डमन सॅक्स बँकेत १७ वर्षे राहिले आहेत. उद्योगपती विल्बर रॉस वाणिज्य विभागाचे प्रमुख होऊ शकतात. एमवे कंपनीचे मालक बेट्सी डेवोस यांचे शिक्षणमंत्री पदासाठी चर्चेत आहे.

जिंकल्यानंतर शेअर बाजाराने मारली उसळी
डोनाल्ट ट्रम्प यांची अमेरिकन अध्यक्षपदासाठी निवड झाल्यापासून शेअर बाजार सतत तेजीत आहे. गेल्या तीन आठवड्यांत डो जोन्स इंडस्ट्रीयल निर्देशांक ८०० अंकापेक्षा अधिक उंचीवर पोहोचला आहे. गुंतवणूक क्षेत्रातील गोल्डमन सॅक्स बँकेचे शेअर्स १७ टक्क्यांनी वाढले.
बातम्या आणखी आहेत...