आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्वचा अन् केसांसाठी नवी उत्पादने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या वर्षात रुक्ष त्वचा आणि केस गळण्याच्या समस्येसाठी काही नवी उत्पादने आणि अँटी-एजिंग प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञान आले आहे.
स्किन लायटिंग इनोव्हेशन्स : भारतीयांच्या त्वचेवर व्रण किंवा डाग फार लवकर पडतात. त्यामुळे तजेलदार त्वचेसाठी क्रीमची मागणी नेहमीच असते. व्रण असलेली त्वचा मुलायम करण्यासाठी वनस्पतिशास्त्र आणि औषधी घटक एकत्रित करून नवे प्रयोग केले जात आहेत. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन या संस्थेच्या एका शोधनिबंधानुसार, ज्या महिलांना हायपरपिगमेंटेशन किंवा त्वचा काळवंडण्याची समस्या होती त्यांच्यावर औषधी वनस्पतीसह कॅटेचीन्स व पोलिफिनोलचे उपचार करण्यात आले. त्यामुळे मेलॅनिनची निर्मिती वेगाने होते.
फिलर्स : तिशीनंतर महिलांच्या चेह-यावर बारीक सुरकुत्या येतात. त्या नष्ट करण्याची चिंता या महिलांना असते. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील त्वचातज्ज्ञांनी सुरकुत्यांची समस्या असलेल्या महिलांच्या त्वचेतील पेशींचे नमुने घेतले. त्यातील कोलॅजन हा घटक निर्माण करणा-या फायब्रोब्लास्टची वाढ केली. त्यानंतर हे फायब्रोब्लास्ट सुरकुत्यांच्या भागात इंजेक्शनद्वारे सोडले. याचे परिणामही सुरक्षित मिळाले. यात खुद्द रुग्णाच्या पेशी वापरल्यामुळे ही प्रक्रिया सुरक्षित ठरते.
केसगळती : अनेक महिलांना केस गळण्यासह पातळ केसांची समस्या असते. सध्या तरी डॉक्टरांच्या सल्ल्यावरून मिनॉक्सिडिल सोल्युशन आणि फिनेस्टेराइड टॅब्लेट हा यावर यशस्वी उपाय ठरत आहे. फिनेस्टेराइड टॅब्लेटचे दुष्परिणाम होऊ शकतात. या वर्षी ट्रॉपिकल फिनेस्टेराइड क्रीम आणि सोल्युशन्स मिळतील. भुवया आणि पापण्यांवरही याचे परिणाम दिसून येतात. सध्या केसगळती आणि पातळ केसांच्या समस्येसाठी हा उपचार केला जात आहे.