आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या चांगल्या वाढीसाठी भावनात्मक शिक्षण आवश्यक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपली मुले कोचिंग समाजामध्ये वाढत आहेत. खेळ आणि अन्य गोष्टींचे त्यांना शिक्षण मिळते. मात्र, इमोशनल कोचिंगसारख्या (भावनात्मक शिक्षण) विषयांकडे आपले साफ दुर्लक्ष असते. याचे शिक्षण कसे दिले जावे हे आपणास समजत नाही. मुलांना भावना समजत नाही, अशा स्थितीला कसे सामोरे जावयाचे हे त्यांना कळत नाही. आई-वडिलांपासून इमोशनल कोचिंग घेणारी मुले नकारात्मक भावनांवर नियंत्रण मिळवत असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर इमोशनल कोचिंग काय असते हे जाणून घेऊ. तुमचा मुलगा घराजवळील बागेतून रडत येतो आणि म्हणतो, मी आता कधी बागेत खेळणार नाही. बागेत काही मुलांनी त्याला त्रास दिल्याचे तुम्हाला कळते. तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही चार पॅरेंटिंग स्टाइल वापराल...
1. मुलाचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न करत राहाल. म्हणाल, बर जाऊ दे. तुला एक चॉकलेट देतो. मुलाला बरे वाटेल. मात्र, त्याचबरोबर तो भावना जाणण्यास आणि त्याची योग्य रीतीने सामना करण्याची संधी गमावली गेली. त्रासदायक, निराश आणि रागात येणे चांगले नाही. याला महत्त्व दिले जाऊ नये, असा त्याचा गृह होईल.
2. तुम्ही चिडताल. मुलास म्हणताल, रडणे बंद कर. रडणे थांबत नसेल तर त्याच्यावर रागवाल. तुम्ही त्याला कराटे किंवा तायक्वांदो क्लास सुरू करताल, मात्र यात मुलास असे वाटेल की, भावनात्मक शिक्षण घेणे कमकुवतपणाचा संकेत आहे. यावर लक्ष देणे तो वाढवण्यासारखेच आहे.
3. मुलाची भावना नैसर्गिकरीत्या स्वीकार करता. त्याला म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी देतात. यामुळे मुलगा भावना चांगल्या पद्धतीने समजू लागेल. मात्र, भावनांचा सामना प्रभावीपणे कसा करावा हे त्याला समजत नाही.
4. मुलाला भावना समजून घेण्यास शिकवले जाते तसेच त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रभावी पद्धत सांगितली जाते. याच्या पाच पद्धती आहेत. मुलाच्या भावना स्वीकारणे. लक्षपूर्वक ऐकून घेणे. भावना समजून घेताना मदत करणे आणि परिस्थितीला तोंड देण्याच्या पद्धती सांगणे. जो स्वत:च्या भावना चांगल्या समजतो व त्यातून बाहेर पडण्यास सक्षम असतो, त्या वेळीच हे सर्व शक्य आहे.