आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीचे भावविश्व ओळखून मायेने द्या मानसिक आधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यू इंग्लंडमध्ये 2005 मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले की, चार वर्षे वयाच्या मुलींमध्ये सामाजिक नाती प्रस्थापित करण्याची पात्रता येते. मित्र-मैत्रिणींचा समूह बनवायला त्यांना आवडते, पण या सर्वांमध्ये केंद्रस्थानी राहण्याची त्यांची इच्छा असते. एकाच समूहातील सर्व मुलींची हीच इच्छा असेल तर काय होईल? त्या एकमेकींना ‘तू काळी असल्यामुळे आमच्या ग्रुपमध्ये येऊ शकत नाहीस’ असे म्हणताना दिसतील. ‘इतर मुलींशी बोलणे बंद केले तर आमच्या ग्रुपमध्ये येऊ शकतेस ’ असे बोलून त्या पॉवर गेमचा वापर करतात. काही मुलींना निसर्गत:च असा स्वभाव असतो. काही मुली मानसिक आघातामुळे अशा बनतात. त्या मित्र-मैत्रिणी बनवू शकत नाहीत. दररोज शाळेत जाणे म्हणजे त्यांच्यासाठी युद्धाच्या मैदानासारखे असते. तुमची मुलगीही अशा प्रकारच्या परिस्थितीतून जात असेल तर तिची मानसिकता समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील उपाय करता येतील.
० मुलीच्या भावना समजून घ्या. तिची अडचण ऐकून घ्या. तिच्यासोबत आपण असल्याची जाणीव करून द्या.
० कधी-कधी मुली एखाद्या मैत्रिणीशी मैत्री करताना खूप कठोर होतात. कणखर मुली कमकुवत मुलींना दम भरतात. मुलींच्या डोळ्यातूनच ही समस्या समजते. पण त्या एकट्या मुलीमुळे एवढी चिंताग्रस्त होऊ नको, इतर मुलींशी मैत्री कर, अशी तिची समजूत घाला.
० तुमच्या मुलीला काही मुलींचे धाडसी व्यक्तिमत्त्व किंवा लोकप्रियता आवडत असते. तिला इतर मुलींमधील गुण पाहण्यास सांगा. त्यामुळे निरोगी मैत्री करण्यास मदत होईल. मुलीला प्रेरित करण्यासाठी चित्रपट, पुस्तके आणि तिच्या आवडत्या कार्टून पात्राचे उदाहरण द्या.
० स्वत:वर केलेल्या कठोर टीकांकडे लक्ष देऊ नये, शक्तिप्रदर्शनाच्या या खेळात पडू नये, हे शिकण्याची संधी तिला द्या. गोष्टी सांगत, विनोदी वातावरण ठेवत मुलीशी मोकळा संवाद साधता येईल.
० मुलगी तणावग्रस्त असल्यास वर्गशिक्षकाशी चर्चा करा. ज्या मुलीमुळे तुमची मुलगी चिंतेत आहे, तिच्या आईशीदेखील संवाद साधता येईल. समजुतीने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.