आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.ranjan Pai MD Of Manipal Education And Medical Group

जुन्या रुग्णालयांच्या आधुनिकीकरणासाठी मणिपाल समूह सज्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
०डॉ. रंजन पै : एमडी, कार्यकारी अधिकारी, मणिपाल एज्युकेशन व मेडिकल समूह

चर्चेत का? : मणिपाल हेल्थ एंटरप्राइजेसने नुकतेच 400 कोटी रुपयांत मुंबईचे डॉ. बालाभाई नानावटी रुग्णालय खरेदी केले आहे. मागच्या वर्षीच क्लालालंपूर येथे 72 खाटांचे रुग्णालय खरेदी केले होते. आता तिथेच 200 खाटांचे रुग्णालय विकसित करण्याचे काम सुरू आहे.

वय : 41 वर्षे, कर्नाटकाच्या मणिपाल गावात जन्म झाला.
कुटुंब : डॉ. टी. एम. ए. पै -आजोबा (मणिपाल समूहाचे संस्थापक). डॉ. रामदास पै- वडील (अध्यक्ष, मणिपाल समूह ) श्रुती-पत्नी (उद्योजिका, स्पा व वेलनेस सेंटरच्या संचालिका), दोन अपत्ये
शिक्षण : कस्तुरबा मेडिकल कॉलेज, मणिपालमध्ये पदवी, अमेरिकेतून रुग्णालय प्रशासनात पदव्युत्तर पदवी

मणिपाल कॅम्पसमध्येच मोठे झालेले डॉ. रंजन पै यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर घरातीलच बिझनेस सांभाळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेत असताना काहीतरी वेगळे करून दाखवण्याचा निश्चय त्यांनी केला. 1997 मध्ये पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर अमेरिकेतील एका रुग्णालयात 3 वर्षे काम केल्यावर त्यांच्या व्यावसायिक जाणिवा प्रगल्भ झाल्या. वयाच्या 28 व्या वर्षी ते भारतात परतले. वर्ष 2000 मध्ये त्यांनी मणिपाल एज्युकेशन आणि मेडिकल समूहाच्या कॉर्पोरेट कार्यालयाची स्थापना बंगळुरूमध्ये केली. डॉ. रंजन म्हणतात, ‘आजोबा व वडिलांनी देशभरात नाव कमावले. आता देशाच्या सीमेबाहेर काम करण्याची गरज आहे. त्यांनी शिक्षण व आरोग्य यावर लक्ष केंद्रित केले होते. शिक्षणात नवे काय करता येईल, यावर रंजन यांनी भर दिला आहे. त्यांनी नेपाळ येथे विद्यापीठाची स्थापना केली. त्यानंतर मलेशिया, दुबई व अँटिगुआ येथेही विद्यापीठ सुरू केले. आरोग्यात सर्वच जण सर्वसामान्य आरोग्य सेवांवर भर देतात. मात्र, त्यांनी सुपर-स्पेशालिटी रुग्णालयांकडे लक्ष दिले. मलेशिया येथे दंतचिकित्सा महाविद्यालयापासून सुरुवात केली. यानंतर अत्याधुनिक आरोग्य सेवेत प्रवेश केला. स्टेम सेल संशोधन प्रकल्प व स्टेम सेल कंपनी ‘स्टेमपुटिक्स’ची स्थापना केली. त्यांनी भारतातील पहिली हेल्थ व वेलनेस रिटेल चेन ‘मणिपाल क्युअर अँड केअर’ची मुहूर्तमेढ रोवली.

रंजन सांगतात, नियोजन होते. व्यावसायिक दृष्टी होती. मात्र, भांडवलाचा अभाव होता. काय करावे हा मोठाच प्रश्न होता. खासगी इक्विटीचा मार्ग निवडला. अनेक खासगी कंपन्यांशिवाय अजीम प्रेमजी व नारायण मूर्ती यांच्या गुंतवणूक कंपनीने पैसा गुंतवला. गुंतवणुकीच्या विचारसरणी आधारेच यश मिळवता आले. दर्जाबाबत तडजोड केली नाही. मणिपालच्या ब्रँड प्रतिमेचाही खूप फायदा झाला.

मणिपाल ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेसचे अ-कार्यकारी अध्यक्ष मोहनदास पै म्हणतात, ‘डॉ. रंजन संकल्पना देतात. योग्य व्यावसायिक व व्यवस्थापकीय कौशल्याच्या व्यक्तीची निवड करतात. स्वत: केवळ सर्वत्र निरीक्षक म्हणून वावरतात. त्यामुळे मालकी व व्यवस्थापनाला वेगळे करणे सहज शक्य होते. आकडे समजण्यात ते निष्णात आहेत.’ मणिपाल हेल्थ एंटरप्रायजेसचे अध्यक्ष स्वामीनाथन दानापानी सांगतात, नोकरदारांमध्ये उद्योजकाचे गुण पेरण्याचे कसब डॉ. रंजन यांच्याकडे आहे.

5 उद्योग रणनीती
० एमईएमजीचे कंपनीकरण करणे. अनेक ज्येष्ठ व सिद्धहस्त व्यवस्थापकांची नियुक्ती करणे.
० कार्यकारी अधिकार्‍यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे. मालक व व्यवस्थापनात योग्य अंतर राखणे.
० उद्योग प्रतिमानात प्रयोग करणे. शिक्षणात विद्यार्थी हित व आरोग्य सेवेत रुग्णांना कें द्रस्थानी ठेवून प्रयोग करणे.
० समूहाची मूल्ये सातत्याने लक्षात ठेवणे. परदेशात व्यवसाय वृद्धी करताना शॉर्टकटचा उपयोग नाही.
० गुंतवणूक संधींचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी सुव्यवस्थित निधी, एरिल कॅपिटलची संरचना केली.