आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Rahis Singh Article About PM Narendra Modi UK Visit

जपान- अमेरिकेप्रमाणेच ब्रिटनचाही दौरा; कूटनीतीपेक्षा गुंतवणुकीवर भर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींचा ब्रिटन दौराही जपान आणि अमेरिकेच्या ट्रॅकवरच पुढे जात असल्याचे आहे. तेथेही कूटनीती-लष्करी मुद्द्यांना वगळून डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, ग्रीन एनर्जी आणि गुंतवणुकीवरच त्यांचा जास्त फोकस आहे. इतर देशांप्रमाणेच येथेही दहशतवादविरोधी लढाईवर सहमती झाली आहे. भारत-ब्रिटनदरम्यान १४ अब्ज डॉलरचे करार झाले. ते ऊर्जा, एंटरटेनमेंट, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि सौर ऊर्जा स्टोअर चेन यांना नवी दिशा देऊ शकतात. पण त्यातून किती रोजगार उपलब्ध होतील हे सध्यातरी निश्चित नाही.

गुंतवणूक आणणे हा मोदींच्या प्रत्येक दौऱ्याचा उद्देश झाला आहे. त्यासाठीचे त्यांचे मार्गही वेगळे आहेत. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना रॉक स्टारप्रमाणे सादर केले जात आहे. हे सर्व एकतर्फी आहे, असे नाही. विदेशी उद्योगपतीही भारतात येण्यास उत्सुक आहेत. चीनचा काळ संपला, येणारा काळ भारताचा आहे, हे काही दिवसांपासून आलेल्या अहवालांतून दिसत आहे. मग तो जागतिक बँकेचा अहवाल असो की आयएमएफची आकडेवारी. त्यामुळे गुंतवणूक आणण्याबरोबरच मोदींना सुरक्षेचे वातावरणही तयार करावे लागेल. आयएस पाकिस्तान आणि बांगलादेशपर्यंत पोहोचला आहे आणि चीन-अमेरिकेच्या सहकार्यामुळे पाकिस्तानचा उद्दामपणा वाढत आहे. त्यामुळे भारताला दहशतवादावर गांभीर्यपूर्वक व्यूहात्मक भागीदारी करावी लागेल. मोदींच्या सांस्कृतिक एकात्मता आणि मनोवैज्ञानिक संबंधांबाबतच्या पावलांचे स्वागत करावे लागेल. पण ‘टू ग्रेट नेशन्स, वन ग्लोरियल फ्युचर’ला अजून वेळ आहे. पंतप्रधानांचे फास्ट ट्रॅक आणि प्रोअॅक्टिव्ह डिप्लोमसीला प्राधान्य आहे. त्यामुळे स्मार्ट शहर आणि मेक इन इंडियापेक्षा पुढे जाऊन शक्यता पडताळाव्या लागतील. त्यामुळे अपराजेय संयोजनापासून भारत आणि ब्रिटन अजून बरेच दूर आहेत, असे म्हणता येऊ शकते.
(परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञ)