आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Sanjay Janavale Article On Liver, Lung Damage

यकृत, फुप्फुसांना नुकसान, क्षयही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालकामगारांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. कारखान्यात खाणीतच नव्हे, तर फटाके बनवणे, हिऱ्याला पैलू पाडणे, सुतळीपासून वस्तू तयार करणे, विड्या वळणे, गालिचा तयार करणे अशा अनेक ठिकाणी लहान मुलांचा कामगार म्हणून वापर केला जातो. भारतात आठ कोटींच्या आसपास बालमजूर आहेत. जेव्हा चौदा वर्षांपर्यंतची कामे मुले कष्ट करून स्वत:चे वा इतरांचे चरितार्थ चालवण्यासाठी धडपडत असतात, तेव्हा ते बालमजूर ठरतात.

चहाची दुकाने, टपऱ्या, छोटी मोठी गॅरेज, किराणा मालाची दुकाने, उपाहारगृहे अशा सर्व ठिकाणी बालकामगार असतात. अविरत कष्टाच्या कहाणीने त्यांच्या दिवसाचा सूर्य उगवतो. या कामामुळे बालकांच्या मनावर अन शरीरावर होणारे दुष्परिणाम दीर्घकालीन असतात. हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या कारखान्यात कमी प्रकाश आणि कोंदट खोकल्यामुळे कामगारांना डोळ्यांचे आणि इतर विकार जडतात. तसेच काच वितळवून त्यांच्यापासून बांगड्या, विजेचे दिव्य, शोभेच्या वस्तू तयार करणाऱ्या कारखान्यात प्रचंड तापमान असते. ४०० सेंटिग्रेडपर्यंत तापमान असणारी वितळवलेली काच, त्यामध्ये वापरली जाणरी रसायनेे यामुळे यकृत, फुप्फुसे खराब होतात. क्षयसारखे रोग जडतात. हे काम करताना उष्णतेपासून डोळ्यांचे संरक्षण करणारे चष्मे वा हातमोजेही बहुधा दिले गेलेले नसतात. चार पाच वर्षांच्या कोवळ्या वयात केलेल्या कामामुळे आयुष्यभर दुष्परिणाम भोगावे लागतात. कोट्यवधी कुटुंबे आर्थिक हलाखीत पुरेसा पगार नसणे, पालकांची व्यसनधीनता, निरक्षरता, अपवादात्मक ठिकाणी आपत्ती, अवर्षणग्रस्त भाग, कमावत्या पालकांचा मृत्यू, क्वचित प्रसंगी मुलांचेच घरातून पळून जाणे, शहरांचे आकर्षण, शेतीकाम, घरकाम, मुलांना, भावंडांना सांभाळणे या आणि यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यतांमुळे बालमजुराला प्रोत्साहन मिळत असते. त्यात भर पडत असते. खरे तर एखादे बाळ जन्माला येते, तेव्हा त्याचे काही हक्क असतात. बालकांना पुरेसे अन्न, कपडे औषधपाणी, निवारा, सुरक्षितता, शिक्षण, संस्कार मिळायला हवे. त्यांचा मानसिक भावनिक, शारीरिक विकास व्हायला पाहिजे अन‌् आनंदी बाल्यावस्था त्याला मिळायला पाहिजे.
पालकांना पुरेशी मजुरी मिळावी
भारतीय राज्यघटनेत चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण असावे, अशी तरतूद आहे. चाइल्ड रिलीफ अँड यू (सीआरवाय)सारख्या संस्थाही बालमजुरी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण तेवढ्याने ही समस्या पूर्णपणे सुटत नाही. बालमजुरांच्या आई-वडिलांना पुरेशी, चांगली मजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
भुकेलेले बालक भविष्य घडवेल?
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे साक्षरता किंवा शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायला हवे. दारिद्र्यरेषेखालील जनतेला कुटुंब कल्याणाचे महत्त्व, शिक्षण आणि त्यांना काम करण्यासाठी प्रतिबंध करणे हेच यावरील चांगले उपाय आहेत. आजचे बालक हे या देशाचे उद्याचे शिल्पकार आहेत. देशाचे भविष्य बदलण्याची शक्ती त्यांच्या ठायी आहे. भुकेलेले, होरपळलेले, अवमानित झालेले बाल्य हे साध्य करू शकेल काय?
राबणारे कोवळे हात
बालमजुरांच्या मनावर अन‌् शरीरावर होणारे दुष्परिणाम दीर्घकालीन असतात. हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या कारखान्यात कमी प्रकाश आणि कोंदट खोकल्यामुळे बालकांना डोळ्यांचे आणि इतर विकार जडतात.अतिशय खर्चिक ठरणारा आजार आहे. काच कारखान्यातील ४०० सेंटिग्रेड तापमानात काम करणाऱ्या मुलांची यकृत, फुप्फुसे खराब होतात.