आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा कला इतिहास आणि सांस्कृतिक वसाहतवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलानिर्मिती क्षमता ही राष्ट्राची ताकद असते. स्वातंत्र्यानंतरही भारतात हस्तलिखित, पुस्तक, प्राचीन देऊळे वस्तूंची मोठी हेळसांड होत आहे. शिक्षणात यांच्या अभ्यासाला अजिबात स्थान नाही. हीच आपली खरी शोकांतिका मोठे दुर्दैव आहे. भौगोलिक वसाहतवाद संपला तरी कला सांस्कृतिक वसाहतवाद अनिर्बंधपणे चालू आहे.

१८५१ मध्ये लंडनच्या हाइड पार्कमध्ये एक प्रचंड औद्योगिक प्रदर्शन भरवले होते. इंग्लंडच्या औद्योगिक प्रगतीचे प्रदर्शन करणे हाच या प्रदर्शनाचा मूळ हेतू होता. भारतासारख्या वसाहती अमेरिका युरोपातील ४४ राज्यांनी यात सहभाग घेतला होता. प्रदर्शनात औद्योगिक उपकरणासह, ब्रिटिश स्थापत्यकलेसह भारताच्या कोहिनूर हिऱ्याचाही समावेश होता. प्रदर्शनास मान्यवरांसह चार्ल्स डिकन्स, लेविस कॅरॉल, जॉर्ज इलियट, अाल्फ्रेड टेनिसन आणि चार्ल्स डार्विनसारख्या शास्त्रज्ञ, विचारवंत लेखकांनी भेट दिली. यामुळे सरकारला लाखो पौंडांचा फायदा झाला. विशेष महत्त्वाचे म्हणजे या पैशातून कुठलाही उद्योग उभारता ब्रिटिशांनी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट विज्ञान नॅचरल हिस्ट्री म्युझियम अशी आजजी जगप्रसिद्ध कला आणि विज्ञान प्रदर्शित करणारी संग्रहालये यातून निर्माण केली गेली. कारण शिल्प, नाट्य, नृत्य, संगीत साहित्य कला हा कुठल्याही संस्कृतीचा किंवा सभ्यतेचा आत्मा असतो आणि ही कला संस्कृती आपली एक शैली घेऊन येत असतात संग्रहालयातून हे प्रतिबिंबित होत असते.

थोडक्यात काय तर व्यापार, उद्योग आणि साहित्यापासून चित्रकलेपर्यतच्या सर्व कलांच्या निर्मितीत फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये स्पर्धा होतीच. १८४४ मध्ये फ्रान्समध्येही असेच औद्योगिक वस्तूंच्या निर्मितीला प्रसिद्धी देण्याकरिता एक मोठे प्रदर्शन भरले होते. इंग्लंडमध्ये भरवले गेलेले प्रदर्शन हे त्या स्पर्धेचाच एक भाग होता. पाश्चात्य जगताकरता ग्रीक आणि रोमन कलांनी त्यांना स्फूर्ती दिली आहे. इन्का, मायन कलांमध्येही त्या त्या संस्कृतीचे प्रतिबिंब दिसते. भारतीय कलाही याला अपवाद होऊ शकत नाहीत. सभ्यता जशी विकसित होत जाते, तसे या कलांचे शास्त्र बनायला लागते आणि त्यातूनच पुढे साहित्यनिर्मिती होते. सांगायचे कारण म्हणजे अतिप्राचीन भारतासारख्या देशानेही आपली विविध भौगोलिक वैशिष्ट्ये जपून अफगाणिस्तान ते केरळपर्यंत कलांचा गाभा मात्र आपल्या भौतिक आणि अाधिभौतिक तत्त्वज्ञानाशी सुसंगत राहिला आहे. चीनपासून मध्य आणि पूर्व आशिया खंडातील सर्वच देशांच्या कलांवर भारताचा प्रभाव दिसून येतो, तरीही दुर्दैवाने भारतीय कलांचा जेव्हा पाश्चात्य कलेशी तुलनात्मक अभ्यास होतो, तेव्हा भारतीय कलांना ग्रीक आणि रोमन कलांपुढे दुय्यम स्थान मिळते. १८५१ च्या लंडनमधील औद्योगिक प्रदर्शनामुळे पुन्हा एकदा अशा चर्चांना सुरुवात झाली. भारतीय संस्कृतीची पाळेमुळे या संस्कृतीवरील पाश्चात्य प्रभाव शोधण्याचा पाश्चात्यांनी आटोकाट प्रयत्न केला. संस्कृत ग्रंथ चाळले, अभ्यासले; पण असे काही आढळले नाही. मग नेमकाच त्या काळात इंग्रजी शिक्षणाचा प्रसार होऊ लागला होता. यातूनच युरोपमधील वैज्ञानिक आणि औद्योगिक क्रांतीची जाणीव भारतीयांमध्येही पाझरू लागली होती आणि हीच सांस्कृतिक वसाहतवादाची सुरुवात होती. ख्रिस्ती धर्मप्रसारक हिंदू धर्मातील वैगुण्ये हिरीरीने मांडत होते. सुधारणेच्या नावाखाली भाषा, वेष ते व्यवहारातील सांस्कृतिक नीतिमूल्यांवरही पाश्चात्य संस्कृतीचे रोपण व्हायला लागले. यात सर्वात मोठा बळी हा स्थापत्य, संगीत, नृत्य आणि इतर कलांचा दिला गेला.

युरोपातील प्रबोधनाचा (रेनेसन्स) काळ आणि भारतातील स्वातंत्र्य चळवळीचा काळ यात युरोपाला तेथील कलांना ज्याप्रमाणे चर्चच्या जोखडातून मुक्ती मिळाली पण त्यातही प्रयत्न मूळ स्रोत संस्कृती कला टिकावी हाच भाग होता, त्याचप्रमाणे भारतातही इंग्रजी शिक्षण आले तरीही महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर ते विवेकानंद आणि अरविंदोंचा प्रयत्नही सुधारणांमध्ये भारतीयत्व जपण्याकडेच होता. भारतील कलांच्या बाबतीत कला-इतिहासकार आनंद कुमारस्वामी यांचे प्रयत्नही विशेष उल्लेखनीय होते. आपल्या सगळ्याच कलांवर आज काही शेकड्यांनी हस्तलिखिते उपलब्ध आहेत. स्थापत्यावर मत्स्यपुराणात तर १८ संहिता आहेत. मात्र, त्या सर्व आज उपलब्ध नाहीत. शिल्पकार या साहित्याचा वापर करून वेगवेगळ्या शैलींनी अगदी पेशवाईपर्यंत मंदिर बांधत होते. राजे नारोशंकर यांनी बांधलेले महादेवाचे देऊळ कश्यप संहितेप्रमाणे आहे. चंद्रचूड यांनी बांधलेले सुंदरनारायणाचे देऊळ भृगुसंहितेप्रमाणे आहे, तर ओढेकर यांनी बांधलेले काळ्या रामाचे मंदिर मयसंहितेप्रमाणे आहे. आज भारतभर प्राचीन मंदिर किंवा गुंफा विखुरलेल्या आहेत. तत्कालीन जीवनशैलीचेच ते प्रतिबिंब आहेत. केशभूषा, वेशभूषा आदी दैनंदिन वापरातील अनेक गोष्टी त्यातून ध्वनित होतात पण मंदिर कसे बघावे, हे आपल्या शालेय शिक्षणाचा एक लहानसा भागही होऊ शकत नाही हे मोठे दुर्देैव आहे. तसेच आज संस्कृतभाषेचे शब्दकोश उपलब्ध आहेत. पण कला किंवा शास्त्राच्या साहित्यात वापरल्या जाणाऱ्या संस्कृत शब्दांचा, त्या संदर्भातील अर्थ सांगणारे शब्दकोश आज उपलब्ध नाहीत. मात्र, सध्या इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टस या संस्थेने अलीकडे कलामूलशास्त्र हा खंडात्मक ग्रंथ प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. यावर एक तज्ज्ञ बेट्टीना शार्डा बाऊमर यांनीही आपले निरीक्षण नोंदवले आहे.
कलांच्या बाबतीत भारत हा एक महासत्ता होता. जीवनाचे असे एकही अंग नाही की, ज्यामध्ये भारतीयांनी कलेचा विचार केला नाही. त्यामध्ये मंदिेरांच्या भिंती काय किंवा अजिंठा - वेरूळची चित्रे का, वेशभूषा, केशभूषा, अलंकारांपासून सर्वत्र काल प्रतिभा ओसंडून वाहताना दिसते. एका संपन्न आणि उन्नत समाजाचेच ते प्रतिबिंब आहे. तत्कालीन साहित्य आणि शिल्पांमध्येही त्याचे चित्रण स्पष्टपणे दिसून येते. भारतीय संस्कृतीची ही कायस्वरूपी प्रदशने आहेत.
सुधारणा, प्रगती आधुनिकीकरण म्हणजे पाश्चात्यीकरण असा एक दृढ समज झाला आहे. सोय आणि व्यापारीकरणाला या प्रक्रियेत कलेपेक्षा वरचे स्थान असते. विचित्रपणा अगदी केसापासून वेशापर्यंत, म्हणजे नावीन्य या कल्पनेमुळे कलेमधील प्रतिभेचे सपाटीकरण झाले आहे. कपड्यांचे जिन करण आणि संगीतातील फ्युजनने प्रतिभेप्रमाणेच अभिरुचीचेही तीन तेरा वाजवले आहेत. प्लेबॉयमधील रुचीहीनतेने शृगांरकलेचा ऱ्हास झाला आहे. ज्या भारतीय संस्कृतीने जीवनाच्या प्रत्येक अंगाला छेदून जाणाऱ्या १४ विद्या आणि ६४ कलांची निर्मिती केली, ती दृष्टी सृजनतेला सोडचिठ्ठी देण्यासारखेच हे आहे. शिवाय राजकारण्यंानी आपल्या सणांचे केलेले विकृतीकरण क्लेशकारक आहे.
बातम्या आणखी आहेत...