आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मापासून राजकारणापर्यंत, कोर्टरुमपासून ते भाषणांमध्‍ये; वाचा बाबासाहेबांनी विविध प्रसंगी केलेले विनोद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंबेडकरी विनोद हा समाजाविषयीच्या करुणेतून निर्माण झाला आहे. दलित साहित्यात कविता, कथा-कादंबरी, नाटक, स्वकथनं हे सर्व वाड़्मयप्रकार कमी-अधिक फुलले, पण विनोद हा वाड़्मयप्रकार फुलला नाही. याचे एक स्वाभाविक कारण म्हणजे अन्याय, अत्याचार, दैन्य, दु:ख, दारिद्ऱ्य, त्याविषयीचा आक्रोश आणि आक्रंदन या विषयीच्या अनुभूतीला दलित साहित्यात प्रारंभी प्राधान्य मिळणे स्वाभाविक होते. त्यामुळे दलित साहित्यात गंभीरपणा, कारुण्य, प्रक्षोभ मोठ्या प्रमाणात दिसतो. मात्र, हास्याचे दर्शन अभावानेच घडते.

बालपणातील विनोद
बालपणापासूनच बाबासाहेबांचा स्वभाव खेळकर आणि खोडकर. बालपणीच्या गमतीदार आठवणी सांगताना त्यांनीच म्हटले आहे की, ‘खरंच बालपणातील ते रम्य दिवस, त्या माझ्या बाललीला, त्या माझ्या खोड्या, तो माझा हट्ट, भांडण मिटवताना आईला पडलेले कष्ट, पिंपरीकरबुवाच्या बायकोला बनवून तिच्या कोंबडीची खाल्लेली अंडी, देवळीकराची झोपमोड केल्यावर ‘भीम्या, तुला पटकी कशी रे येत नाही’, हे त्यांचे बोलणे, हे सारे प्रसंग कालच घडले आहेत असे वाटू लागते.’

१३ जून १९५३ रोजी मुंबईतील रावळी कँप येथे महिला मंडळासमोर बाबासाहेबांचे ‘शिक्षणाबरोबर शीलही सुधारलं पाहिजे’ या विषयावर भाषण झाले. भाषणाच्या ओघात बाबांनी त्यांच्या विद्यालयीन शिक्षणाची आठवण सांगितली. त्यांनी सांगितलेला हा प्रसंग डोळ्यापुढे उभा केल्यास हसू आल्याशिवाय राहणारा नाही.
 
ते म्हणतात, ‘मला शाळेत घ्यायचे की नाही याचा खल करण्यासाठी तीन-तीन दिवस मास्तरांची सभा भरली होती. मला त्या वेळी सरकारकडून तीन रुपये स्कॉलरशिप मिळत होती. या मुलाला शाळेत घेतले नाही तर सरकारचा कोप होण्याचा संभव आहे, या सबबीवर मला सरकारी हायस्कूलमध्ये घ्यायचे ठरले. त्यावेळी मी निव्वळ गावठी पोर होतो. पहिल्या दिवशी मी हायस्कूलमध्ये माझ्या चाळीस वर्षे वयाच्या भावाचे शर्ट घालून गेलो. पायापर्यंत घातलेला शर्ट असा त्या वेळी माझा अवतार होता.’
 
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, विविध प्रसंगी बाबासाहेबांनी धर्म, राजकारण आणि सामाजिक विषयांवर केलेले विनोद... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...