आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांना होती क्रॉकरीजची आवड, कलकत्‍याहुन मागवायचे हिलसा मासळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'डॉ. बाबासाहेब आंबेडकर\' या सिनेमातील फोटो. - Divya Marathi
\'डॉ. बाबासाहेब आंबेडकर\' या सिनेमातील फोटो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव उच्‍चारल्‍याबरोबर कोट-टाय-बुट असे ड्रेसअप केलेले राजबिंडे व्‍यक्‍तीमत्‍व आपल्‍या डोळ्यासमोर उभे राहते. बाबासाहेबांचे तारुण्‍य शिक्षणानिमित्‍त पाश्‍चात्‍य देशात गेले. त्‍यांना तेथील राहणीमान-खाणपानाची पध्‍दत आवडत असे. किंबहूना तो त्‍यांच्‍या व्‍यक्तीमत्‍वाचा भाग बनला होता.
 
इंग्‍लंड-अमेरिकेत बराच काळ गेल्‍यामुळे बाबासाहेबांच्‍या दिनचर्येतही त्‍याची झलक पाहायला मिळायची. त्‍यांना 'बेडी टी' लागायचा, तोही इंग्रजी पध्‍दतीचा. उकळलेला चहा, दूध व साखर हे वेगवेगळ्या भांडयात आवडीनुसार ते घ्‍यायचे. असा त्‍यांचा दिवसाचा पहिला चहा असायचा. हे सर्व त्‍यांना साग्रसंगीत लागायचे. चहाचा ट्रे त्‍यांच्‍या बेडरुममध्‍ये आणून त्‍यांना चहा दिला जात होता.

क्रॉकरीची होती विशेष आवड
- बाबासाहेबांना जेवणाची जशी आवड होती त्‍याचप्रकारे चहा, कॉफीसाठी निरनिराळ्या प्रकारचे क्रॉकरीचे संच (crockery set) त्‍यांना आवडायचे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मसूदा समितीच्‍या अध्‍यक्षपदी निवड झाल्‍यानंतर त्‍यांचे वास्‍तव्‍य दिल्‍लीतच सर्वाधिक राहात होते. '1, हार्डींग्‍ज अॅव्‍हेन्‍यू (1, Hardings Avenue), नवी दिल्‍ली' या सरकारी बंगल्‍यात तेव्‍हा ते वास्‍तव्‍याला होते.
- बाबासाहेबांच्‍या घरी चहासाठी चहाचाच क्रॉकरी सेट आणि कॉफीसाठी कॉफीचाच सेट वापरला जायचा.
त्‍यांच्‍या '1, हार्डिंग्‍ज अॅव्‍हेन्‍यू' बंगल्‍यावर विविध प्रकारचे सेट्स होते.
- ब्रेकफास्‍ट, लंच आणि डिनर यासाठीही वेगवेगळे सेट्स ते वापरायला सांगत. एवढेच नाही तर विविध समारंभांप्रसंगी वेगवेगळे सेट्स वापरण्‍याच्‍या त्‍यांच्‍या सूचना असत.
- डायनिंग टेबलवर प्‍लेट्स, काटे, चमचे व इतर भांडी अगदी विशिष्‍ट पध्‍दतीने व सर्व्हिसप्रमाणे असाव्‍या, असा बाबासाहेबांचा आग्रह असे.
- पाश्चिमात्‍य देशात त्‍यांचे तारुण्‍य गेल्‍याने तेथील टापटिप व निटनिटकेपणा त्‍यांच्‍या मनावर बिंबली होती.

पुढील स्‍लाइडवर वाचा, कलकत्‍याहून विमानाने मागवायचे मासळी
 
हे पण वाचा,
 
 
 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...