आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष: रोज 10 पैकी 4 जण करतात आंबेडकरी साहित्य वाचन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष, जातीय व्यवस्थेविरुद्ध दिलेला लढा, वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे विचार, देश-परदेशात गाजलेली भाषणे आणि भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी घेतलेले परिश्रम याबाबत संशोधक आणि अभ्यासकांप्रमाणेच सर्वसामान्यांनाही कुतूहल आहे. ते शमवण्यासाठी ही मंडळी मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांच्या साहित्याचे वाचन करतात. यामुळेच शहरातील ग्रंथालये, वाचनालये पुस्तक प्रदर्शनांत बाबासाहेबांशी संबंधित साहित्याला मोठी मागणी अाहे. शहरातील एकूण वाचकांपैकी ३० ते ४० टक्के वाचक दररोज आंबेडकरी साहित्याचे वाचन करून स्वत:ला समृद्ध करत आहेत. 
 
औरंगाबादही आंबेडकरी चळवळीची कर्मभूमी. शहराला बाबासाहेबांचा पदस्पर्श झाला आहे. महामानवाचा सहवास लाभलेला एक मोठा वर्ग आजही शहरात आहे. मात्र, आजची नवीन पिढी बाबासाहेबांच्या विचारांचे वाचन करते का? त्यातल्या त्यात पुस्तक वाचन संस्कृती लोप पावत चालल्याची भीती व्यक्त होत असताना आंबेडकरी साहित्याची आज काय स्थिती? हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त ‘दिव्य मराठी’ने या प्रश्नांची उत्तरे शोधली. त्यातून आंबेडकरी साहित्याला आजही मोठी मागणी असल्याचे समोर आले. दररोज १० पैकी किमान ३-४ वाचक खास आंबेडकरी साहित्याचेच वाचन करतात, असे या पाहणीतून स्पष्ट झाले. पाहणीसाठी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ग्रंथालय, शासकीय ग्रंथालय, बळवंत वाचनालय, मनपा वाचनालय आणि अजब प्रकाशनच्या पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली. तेथील अधिकारी आणि वाचकांशी संवाद साधला. त्यातून पुढील माहिती समोर आली. 
 
पढील स्लाईडवर वाचा, वाचकांमध्ये संशोधक, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी , गृहिणी, ज्येष्ठांचे प्रमाण अधिक आणि आंबेडकरी साहित्याचे वाचक  कोण काय म्हणतेय... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...