आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रक्रियेशिवाय हृदयाच्या झडपेचे प्रत्यारोपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हृदयाच्या उजव्या बाजूला एक अॅरोटिक व्हॉल्व्ह असतो. याला मोठी धमनी असे म्हणतात. ती हृदयापासून रक्ताला शरीराच्या दुसऱ्या भागात पाठवत असते. कधी कधी ही झडप लहान होते. त्याला अॅरोटिक व्हॉल्व्ह स्टेनोसिस असे म्हणतात. स्टेनोसिसमुळे झडप पूर्णपणे उघडत नाही. त्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी सामान्यत: खूप मेहनत करावी लागते. यामुळे डाव्या व्हेंट्रिकलवर दबाव वाढू लागतो. यामुळे हृदयाच्या मांसपेशी कडक होतात. काही काळ हृदय हा दबाव सहन करतो; पण हृदयावर सतत दबाव पडत गेला तर हार्ट फेल्युअरचे कारण ठरते.

अॅरोटिक व्हॉल्व्ह स्टेनोसिसची कारणे
अॅरोटिक व्हॉल्व्हमध्ये कॅल्शियम साचणे
हृदयात जन्मत: विकृती असणे
संधिवाताच्या तापामुळेही झडप निकामी होणे.अॅरोटिक स्टेनोसिसची लक्षणे : बहुतांश रुग्णांमध्ये कित्येक वर्षे कोणतेही लक्षण दिसून येत नाही; परंतु झडप जेव्हा संकुचित होऊ लागते तेव्हा काही लक्षणे दिसून येऊ लागतात. ही लक्षणे तुम्ही जेव्हा व्यायाम करत असता तेव्हा हृदयावर ताण येतो त्या वेळी दिसून येऊ लागतात. छातीत दुखणे किंवा दबाव (अॅन्झायना), छाती आखडल्यासारखी वाटणे, चक्कर येणे इत्यादी.

उपचार : हे एक तंत्र आहे. ट्रान्सकॅथेटर अॅरोटिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट ज्याला ट्रान्स कॅथेटर एअरोटिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशनसुद्धा म्हटले जाते. या तंत्राने छातीवर एक छेद न घेताही हृदयातील एअरोटिक व्हॉल्व्हचे प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे. याआधी छातीच्या झडप खराब झाली तर ओपन हार्ट सर्जरी किंवा व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट हाच एकमेव उपाय होता. ट्रान्सकॅथेटर अॅरोटिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) किंवा ट्रान्सकॅथेटर अॅरोटिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन (टीएव्हीआय) म्हणजे काय?

टीएव्हीअार किंवा टीएव्हीआय ही अशी सर्जिकल प्रक्रिया आहे की, ज्यामध्ये छेद न देता आणि निकामी व्हॉल्व्हला न काढता तेथे नवी झडप बसवली जाते. यामुळे व्हॉल्व्ह दुसऱ्यांदा खराब होण्याची किंवा अॅरोटिक व्हॉल्व्ह डिसिजमुळे रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता खूप कमी असते. परंतु रुग्ण जर अशाच प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त असेल तर त्यांच्यासाठी पारंपरिक हार्ट व्हॉल्व्ह सर्जरी योग्य नाही. त्यांच्यासाठी टीएव्हीआय चांगला पर्याय ठरतो.

रुग्णांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. एअरोटिक स्टेनोसिस किती गंभीर आहे ते पाहण्यासाठी इकोकॉर्डिओग्राफी केली जाते. व्हॉल्व्हच्या पोझिशनिंगसाठी अॅरोटिक रूटची अँजिओग्राफी केली जाते. कोरोनरी आर्टरी डिसिज किंवा पलमोनरी हायपरटेन्शनचा तपास करतात. नलिकांचा व्यास, कॅल्शियम साचण्याचे प्रमाण जाणून घेण्यासाठी सीटी अँजिओग्राफी केली जाते.

कोणत्या रुग्णांसाठी उपयुक्त?
ज्यांना गंभीर स्टेनोसिस आहे.
ज्यांचे ऑपरेशन करणे शक्य नाही.
ज्यांना सर्जरीमुळे अत्यधिक धोका असतो.
ज्यांची कोरोनरी बायपास सर्जरी झालेली आहे.
टीएव्हीआय प्रक्रिया अॅनेस्थेशियामध्ये केली जाते. त्यात एक कॅथेटर (पातळ, पोकळ, लवचिक नलिका) घेण्यात येते. एक नवा व्हॉल्व्ह दुमडून कॅथेटरमध्ये टाकण्यात येतो. मग त्याला पायाच्या नलिकेत टाकण्यात येते. जेव्हा कॅथेटर एओरटाच्या बेसपर्यंत पोहोचतो तेव्हा मोठी रक्तनलिका जी हृदयाकडून रक्त दुसऱ्या भागात घेऊन जाते. डॉक्टर फुगा उघडतात, त्यामुळे व्हॉल्व्ह फुगतो. जुना व्हॉल्व्ह तेथेच राहतो. मग त्याला नव्या व्हॉल्व्हद्वारे एका बाजूला केले जाते.

डॉ. अजय कौल
अध्यक्ष, विभागाध्यक्ष, कार्डिओथोरॅसिक सर्जरी, बीएलके हार्ट सेंटर, नवी दिल्ली.
बातम्या आणखी आहेत...