आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr Ashish K Sharma Article About Knee Replacement

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुडघा बदलणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडघ्याच्या सांध्यामध्ये जेलीसारखा घटक असतो. ज्याला कार्टिलेज असे म्हणतात. कारमध्ये ज्याप्रमाणे शॉक अ‍ॅब्सॉर्बरचे कार्य असते, त्याप्रमाणे कार्टिलेजसुद्धा गुडघ्यातील गादी किंवा शॉक अ‍ॅब्सॉर्बरचे काम करतात. काळानुरूप किंवा एखाद्या दुर्घटनेत कार्टिलेज खराब होत जातात, त्यामुळे पिंढरीचे हाड आणि जांघेचे हाड एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यांच्यात घर्षण झाल्याने दुखू लागतात किंवा आखडतात. याला आर्थरायटिस असे म्हणतात.

गुडघ्यावर त्याच्या अवस्थेनुसार उपचार केले जातात. जर रुग्णास सतत दुखत असेल (चालताना, पळताना, गुडघे टेकवल्यावर आणि वाकवताना अडचण), खूप वेळ एकाच जागी बसल्याने सांधे आखडणे, सांध्यावर सूज असली तर त्याला स्टिराॅइड किंवा हाऑलॉनिक अ‍ॅसिडचे इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला जातो. याचा परिणाम दोन ते सहा महिन्यांपर्यंत असतो. खूप काळ वेदनाशामक गोळ्या घेणे हानिकारक असते. याचा किडनी व शरीराच्या अन्य भागांवर दुष्परिणाम होऊ शकतो. औषधी, फिजिओथेरपी आणि नियमित व्यायामाचा परिणाम होत नसेल, तर सर्जरी किंवा टोटल नी रिप्लेसमेंटचा (टीकेआर) सल्ला दिला जातो. सर्जरी लांबणीवर टाकता येत नाही, अन्यथा गुडघ्याची अवस्था गंभीर होते.

गुडघे - गोलाकार आणि अंडाकार
बहुतांश लोकांना वाटते की, आमच्या गुडघ्याचे काम फक्त वाकवणे आणि सरळ करणे इतकेच आहे. मात्र, गुडघा गोलाकार फिरतोसुद्धा. आपल्या ९० टक्क्यांहून अधिक हालचाली म्हणजे, चालणे, पायर्‍या चढणे-उतरणे, खुर्चीवर बसणे आणि पोहणे इत्यादी १० ते ११० डिग्री रेंजमध्ये होतात. काही हालचाली जसे जमिनीवर बसणे, टॉयलेटमध्ये बसणे इत्यादी कामांसाठी ११० पेक्षा अधिक डिग्रीपर्यंत मानवी गुडघे गोलाकार एकाच केंद्रबिंदूवर चक्राकार फिरत असतात. जमीन सपाट आहे असे आधी मानले जात असे, तशाच प्रकारे गुडघ्याचा आकार अंडाकृती असल्याचे शास्त्रज्ञांनाही वाटत होते.

शरीररचना विज्ञान आणि जुन्या पिढीतील इमेजिंग तंत्राने कळले की गुडघ्याचे अनेक केंद्रबिंदू आहेत. यामुळेच विविध हालचाली उदा. पाय एकमेकांत दुमडून बसणे, पायर्‍या चढणे आणि व्यायाम इत्यादी करता येतात; परंतु इमेजिंग तंत्राच्या विकासाबरोबरच गुडघ्याची रचना अधिक खोलवर समजून विशेषत्वाने थ्रीडी इमेजिंगसह जाणून घेऊन असा निष्कर्ष काढण्यात आला की, नैसर्गिकरीत्या गुडघा फिरवणे (१० ते ११० डिग्रीवर मानवी गुडघे दुमडण्यावर) गुडघा गोलाकार फिरतो, तो अंडाकार फिरत नाही. अशा प्रकारे मानवी गुडघ्याची कार्यक्षमता आणि प्रक्रिया पाहता पेटंट डिझाइन सिंगल रेडियस किंवा राउंड नी सिस्टिमचे तयार करण्यात आले. मात्र, भारतात अजूनही प्रत्यारोपण अंडाकृतीच होते; पण ब्रिटन आणि अमेरिकेत याचा वापर यशस्वीरीत्या करण्यात येत आहे.

ट्रायथलॉन एक्स ३ प्रत्यारोपण
नैसर्गिक गुडघ्याच्या सिद्धांतावर आधारित सिंगल रेडियस डिझाइन, ट्रायथलॉन अमेरिका, ब्रिटन आणि आस्ट्रेलियामध्ये सर्वात यशस्वी गुडघ्याचे प्रत्यारोपण मानले जाते. सिंगल रेडियस नी (ट्रायथलॉन) नैसर्गिक गुडघ्याप्रमाणे गोलाकारच फिरतात. यासाठी या रुग्णांना नैसर्गिक गुडघ्याप्रमाणे १५० डिग्रीत फिरण्यासारखा स्थिर आणि सुस्थितीत गतिशीलतेचा अनुभव येतो. याच्या डिझाइनमुळे प्रत्यारोपण दीर्घकाळ चालते.

याचे फायदे
हे नैसर्गिक गुडघ्याच्या डिझाइनसारखेच असते. यामुळे रुग्ण कोणाच्याही मदतीशिवाय चालू लागतात. त्यांना फिजिओथेरपीच्या सत्रांची गरज खूप कमी भासते. सिंगल रेडियस नीला अशा प्रकारे डिझाइन करण्यात आले आहे. यामुळे जांघेतील मांसपेशीवर ५७ टक्क्यांपर्यंत कमी दाब पडतो. जांघेतील मोठ्या मांसपेशी गुडघ्यास ताकद आणि गतिशीलता प्रदान करतात आणि हे रिकव्हरीमध्ये महत्त्वाचे असते.

डॉ. आशिष के. शर्मा
सिनियर कन्सल्टंट, आॅर्थोपेडिक्स, एसडीएम हॉस्पिटल, जयपूर.