मनुष्य कोणत्याही परिस्थितीत एक निश्चय करत असतो- कृष्ण, माणसांच्या प्रत्येक निश्चयापलीकडे जात लोकांना विभ्रम आणि अनिश्चिततेत सोडून देतात. मनुष्य "आश्वस्त' झाल्याशिवाय काहीच करत नाही. त्याला जीवनात प्रत्येक सुख पुन्हा पुन्हा यावे, असे वाटत असते. सुखाची कामना करणे आणि त्याचा पुन:प्रत्यय घेणे हा त्याच्या स्वभावाचा एक भाग आहे. कृष्णाला पाहणे, त्यांना पाहणे म्हणजे त्यांच्यासोबत जगातील प्रत्येक व्यक्तीला सुखाची एक वेगळ्याच अनुभूतीची जाणीव होते. प्रत्येकास वाटत असते की, आता होते... न जाणो कुठे गेले? डोळे मात्र त्यांना शोधत असतात. हृदयातून साद जात असते. पण ते दूर गेलेले असतात. ते
आपणास आश्वस्त करत नाहीत किंवा त्यांच्याकडे कोणते सुख पुन्हा पुन्हा अनुभवण्यास मिळते असेही नाही. ते जीवनातील "रस' आणि "आनंद' याची मूर्ती आहे. त्यांच्या सान्निध्यात प्रत्येक सुखाचा नवाच अनुभव येतो.
अनिश्चितता तर त्यांच्या आवडत्या यशोदा मांपासूनच प्रारंभ होते. बाल श्रीकृष्णाला माती खाताना पाहून ती त्याला रागावते, त्याला तोंड उघडण्यास सांगते. कृष्णाने तोंड उघडताच त्यांच्या तोंडात ब्रह्मांड पाहून मूर्च्छित पडते. काही क्षणांनंतर ती जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा कृष्णाला पुन्हा न्याहाळते, तेच निरागस हास्य आणि चेहर्यावरचा गोंडस भाव असे बालरूप दिसते. आता तेथे जगाची सत्ता नाही तर बालकाचे मोहक हास्य दिसते. कृष्ण आहे तरी कसा? हे तिलाही उमजत नाही. या चराचर रूपातील साक्षात परमेश्वर किंवा तिचा प्रिय मुलगा श्रीकृष्ण? श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलराम त्याच्यावर खूप प्रेम करत असूनही काहीसे नाराज असतात. आपली नाराजी कृष्णाचा चेहरा न पाहताही ते व्यक्त करतात- त्यांना नेहमी भीती वाटत असते की, मी जर कृष्णाकडे पाहून नाराजी किंवा असहमती व्यक्त केली तर तेसुद्धा कृष्णाशी सहमत होतील. मग त्यांची नाराजी आणि रागाचे काय होणार? कृष्णाचे हास्य रहस्यमय असते. त्यांचा निरागस चेहरा पाहून प्रसन्नता आणि नाराजी, सहमती व असहमतीदरम्यान बलराम आयुष्यभर द्विधा मन:स्थितीतच वावरले.
कृष्णाचा अत्यंत प्रिय बालसखा सुदामाकडे तर अठराविश्वे दारिद्र्य होते. ते द्वारकाधिपती कृष्णाची भेट घेतात. अथांग मैत्री आणि करुणेच्या भावनेतून ते त्याच्याकडे पाहतात. सुदाम्याच्या जीवनातील सर्व "अभाव' नाहीसा होतो.
राधा तर त्यांची अनन्या आणि आद्यशक्ती आहे. प्रेयसी, सखी आणि गहन मैत्रीण आहे. कृष्णाच्या हृदयरूपी अथांग सागरात लीला करत असलेले तिचे प्रेम.
जो प्रेमात असतो त्याच्यासाठी "वेळ' हरवलेला असतो. काळाचे भान नसते. तेव्हा एका अर्थाने नीती आणि मर्यादेत बांधलेले हे जीवनसुद्धा हरवत चालल्यासारखे वाटते. विना "प्रेम' आणि "रस' जीवनाला आपण तुरुंगाप्रमाणे बनवतो. आम्ही कृष्णावर आपली "नीती' व "मर्यादा' थोपलेल्या आहेत. या नीती आणि मर्यादा आम्हा मनुष्याने तर निर्माण केलेल्या आहेत. कृष्ण तर "समग्र'चे "जीवन' आणि "अनंता'ची मर्यादा आहेत. त्यांच्याबरोबरच भारतात एका नव्या धार्मिकतेचा उदय झाला. तेथे प्रेमाच्या आकाशात त्यांच्या बासरीची लय आणि तान हरवून जाण्यासाठी मनुष्यास आवाज देत असते.
हा आवाज ऐकूनच आपण त्यांच्या मागे धावत असतो. परंतु श्रीकृष्ण अनंतात लपून जातात. आपणास नेहमी असे वाटत असते की, आपण त्यांना नेहमी जवळून आवाज देतो आहोत, पण जेव्हा त्यांच्याकडे धावत जातो तेव्हा ते अंतरसुद्धा तेवढेच दूर असतात.
डॉ. कपिल तिवारी
मध्य प्रदेश आदिवासी आणि लोककला अकादमीचे माजी संचालक