आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीन थेरपीच्या माध्यमातून हृदयरोग्यावर उपाय सोपा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हृदयावरील शस्त्रक्रियेच्या संदर्भात तंत्रज्ञान, औषध आणि संशोधन या क्षेत्रात मागील वर्षी अतिशय चांगली प्रगती झाली. 2013 मध्ये नवीन ट्रान्सकॅथेटर व्हॉल्व्ह आले, ज्यांच्यामुळे शस्त्रक्रियेतील जोखीम कमी झाली. हृदय बंद पडल्यास उपयोगी ठरणारे हार्ट असिस्ट उपकरणाचा आकार आता आणखी छोटा झाला आहे. मॅग्नेटिक लेव्हिटेशन टेक्नॉलॉजीमुळे याचे टिकाऊपण वाढले आहे. ईसीएमओ उपकरण आता अधिक सुरक्षित बनले आहे. फुप्फुस किंवा हार्टफेल होणार्‍या रुग्णांसाठी आता आशेचा नवा किरण आहे.

हृदयविकारावर नवी औषधे आल्याने उपचार आता आणखी सुरक्षित झाले आहेत. ज्यांच्या हृदयाचे व्हॉल्व्ह बदलले आहेत किंवा ज्यांच्या हृदयाची गती असामान्य आहे, त्यांच्यासाठी नवे ब्लड थिनर उपयोगी ठरणारे आहेत. आता रुग्णांना ब्लड मॉनिटरिंगची गरज भासणार नाही. यापूर्वी ब्लड थिनर मॉनिटरिंगची गरज होती. कोलेस्टेरॉल कमी करणार्‍या स्टेटिन्स या औषधासाठी अमेरिकन हार्ट असोसिएशनने काही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. यामध्ये असे म्हटले आहे की, रुग्णांची कोलेस्टेरॉल पातळी काही का असेना, या औषधाचे जादा डोस घ्यावेत. हार्ट हदम डिस्टर्बन्स पोर्ट कार्डिएक बायपास सर्जरी टाळण्यासाठी जीवनसत्त्व क आणि ई अशा अँटिऑक्सिडंटचा वापर परिणामकारक सिद्ध झाला आहे. अशा प्रकारे हृदयविकारावरच्या शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात कल्पनेपेक्षा अधिक प्रगती झालेली आहे. जीन थेरपी हे आणखी एक वरदान आहे.आघात झालेल्या पेशीवर उपचार करणे आणि मृत स्नायूंना पुन्हा कार्यरत करणे हे आता जीन थेरपीमुळे शक्य झाले आहे.

टिश्यू इंजिनिअरिंग आणि स्टेम सेल्स या क्षेत्रात मोठी प्रगती झाल्याने ट्रान्सप्लांटेशनसाठी नवे हार्ट टिश्यू तयार करणे शक्य झाले आहे. बदलाला आणि हृदयविकाराला कारणीभूत ठरणार्‍या इम्यून सेल्सची ओळख करणे आता शक्य आहे. आता अधिक चांगली उपकरणे आणि बायपास पंप आले आहेत. अ‍ॅनेस्थेशिया देणे आता अधिक सुरक्षित झाले आहे. हृदयविकारावर शस्त्रक्रियेसाठी आता यंत्रमानवही मदत करतात. अर्थात हेही बरोबर आहे की, यामुळे हृदय शस्त्रक्रियेचा खर्चही वाढत आहे. 2014 या चालू वर्षात आम्ही मोठ्या आशेने पाऊल ठेवले आहे. हार्ट रुग्णांना मॅनेज करण्यासाठी अधिकाधिक संशोधन होत आहे.