आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राधान्यक्रम ठरवा, नियोजन करणे सोपे होईल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक दिवस मी घराजवळच्या दुकानात खरेदीसाठी जात होते. डोक्यात विचारांचा गुंता होता. याच गोंधळात मी असे काही केले, जे माझ्या प्रतिमेला छेद देणारे होते. मी माझ्या शेजार्‍यांशी बोलण्यास सुरुवात केली. घरी सेंद्रिय भाजीपाला घेण्याच्या माझ्या प्रयोगाचे त्यांनी कौतुक केले. हा माझ्या भावनात्मक जीवनाचा विस्मरणात गेलेला घटक आहे.

ज्या महिला एकाच वेळी अनेक कामे करतात त्यांना एका भूमिकेतून दुसर्‍या भूमिकेत जाणे कठीण होते. काम करताना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा लागतो. घरी आई या नात्याने मुलांची काळजी घेणे, पत्नी या नात्याने पतीचे बोलणे धिराने ऐकणे, घरातील वयोवृद्धांची काळजी घेणे आणि मित्रमंडळींना त्यांचा अडचणी ऐकवण्यासाठी हक्काचे माणूस - एक महिला एवढ्या भूमिका कशा काय पार पाडते? या भूमिकांची गरज पूर्ण करू शकेल, असे भावनिक बुद्धिचातुर्य त्या कसे मिळवतात? आपल्या छंदासाठी त्या वेळ कशा काढतात? पुढीलपैकी एक पद्धत अंगीकारल्यास या सगळ्या भूमिका पार पाडणे सोपे होईल ...

पहिली पद्धत : डॅनियल गोलमॅन याने भावनिक बुद्धिचातुर्यावर लिहिलेल्या पुस्तकात हे चार भागात विभागले आहेत. पहिले स्वयंजागरूकता, सहानुभूती, भावनिक व्यवस्थापन आणि सामाजिक कौशल्य. महिलांमध्ये सहानुभूती म्हणजे इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता अधिक असते. कुटुंबात कोणत्या सदस्याला किंवा कोणत्या मित्राला आपली गरज आहे हे त्यांना ठाऊक असते आणि त्यानुसार आपली भूमिका वठवणे त्यांना सहज जमते. एखाद्याच्या भावना समजून घेणे आणि भावनिकदृष्ट्या त्यांच्यासाठी सदैव उपलब्ध असणे ही वेळेची योग्य गुंतवणूक आहे. ज्या व्यक्तीला तुमची गरज आहे त्याच्यासाठी प्रत्यक्ष हजर असावे. फोनवरून बोलण्याने काहीही फायदा होत नाही. अनेकांना तुमची गरज असेल तर सर्वाधिक गरज कोणाला आहे, कोण सर्वाधिक महत्त्वाचे आहे हे तुम्हाला ठाऊक असले पाहिजे.

दुसरी पद्धत : बॉसच्या भूमिकेतून दुसर्‍या क्षणी आई आणि पुढच्या क्षणी पत्नीची भूमिका पार पाडणे सोपे नाही. वेगवेगळ्या भूमिका साकारण्यासाठी स्वत:ला थोडा वेळ द्या. तुम्हाला प्रवास करावा लागत असेल तर त्या वेळेचा लाभ घ्या. पुस्तक वाचा किंवा संगीत ऐका. असे केल्यास विविध भूमिका साकारताना अडचण होणार नाही.

तिसरी पद्धत : ही अत्यंत फायदेशीर पद्धत आहे. दिवसातून दोन वेळा स्वत:च्या एखाद्या कृतीबाबत विचार करा. यासाठी पाच मिनिटे पुरेशी आहेत. आपली प्रतिक्रिया काही काळ मनावर उमटू द्या. यामुळे कोणती व्यक्ती तुमच्या आयुष्यात अधिक महत्त्वाची आहे, कोणाला वेळ देणे तुमच्यासाठी गरजेचे आहे हे लक्षात येईल. ही भावनिक बुद्धिचातुर्याची दुसरी बाजू आहे. याला स्वयंजागरूकता असे म्हणतात. यामुळे परिस्थितीनुसार व्यक्त होणे आणि नियोजन करणे सोपे होते.
- ‘गुड हाऊसकीपिंग’मधून

डॉ. प्रभा चंद्रा
मानसशास्त्राच्या प्राध्यापिका, एमआयएमएचएएनएस, बंगळुरू