आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधिवात महिलांमध्येच जास्त का?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या संधिवातावर वेळीच उपचार शक्य झाले आहेत. यासाठी या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांनी संधिवात रोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.

आपली रोगप्रतिकारक शक्ती पेशींचे चांगले नेटवर्क असून ती थेट मुळापासून अत्यंत क्लिष्ट परिस्थितीत काम करते. या सिस्टिमचा उद्देश आपल्याला पर्यावरणापासून सुरक्षित ठेवणे आणि आपल्या पेशींना कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचू नये, हे पाहण्याचा आहे. परंतु कधी कधी आपल्या या तंत्रात काही उणिवा निर्माण होतात आणि काही संकेत नीट समजून येत नाहीत. परिणामी, आपली रोगप्रतिकारक शक्तीची प्रणाली आपल्याच पेशींना ओळखू शकत नाही आणि त्यांच्यावरच हल्ला करते. यामुळे ऑटोइम्यूनसारख्या रियुमेटोइड आर्थरायटिस (सांध्यावर सूज) सिस्टमिकल्युपस अ‍ॅरिथिमॅटोसस (सोप्या शब्दांत याला "ल्युपस' असे म्हणतात म्हणजे कनेक्टिव्ह पेशीमध्ये सूज) आणि व्हॉस्क्यूलायटिस (शरीरातील धमन्यांवर सूज) होतात.

संधिवाताचा त्रास महिलांमध्ये होणार्‍या अ‍ॅस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन नावाच्या हार्मोन्सच्या बदलामुळे होतो. या हॉर्मोन्सचे रोगप्रतिकारक शक्तीच्या प्रणालीवर आणि सांध्यावर सूज आल्यानंतर विशेष योगदान असते. ज्या माता आपल्या बाळांना स्तनपान करवत असतील, त्यांना संधिवाताचा धोका कमी असतो.

ऑटोइम्यून म्हणजे काय?
माणसाला १०० हून अधिक ऑटोइम्यून रोग होऊ शकतात. यात काहींना कनेक्टिव्ह पेशीचा रोग म्हटले जाते. कारण त्यांचा परिणाम सांधे, मांसपेशी, हाडे आणि कधी कधी मूत्रपिंड, फुप्फुस, रक्तवाहिन्या आणि मेंदूवरही होतो. शरीराची सुरक्षा करणारे तंत्र संक्रमण किंवा एखाद्या रोगामुळे शरीरातील सुदृढ पेशींना नुकसान पोहोचवते, त्यामुळे हे रोग होण्याची शक्यता असते.

ऑटोइम्यून रोग कोणते?
रियुमॅटाइड आर्थरायटिस (संधिवात) एक किंवा त्यापेक्षा अधिक सांध्यांत दुखणे, खासकरून हात आणि पायाचे लहान लहान सांधे सकाळी उठल्यानंतर कमीत कमी ३० मिनिटांपर्यंत आखडलेले असतात.
अँकिलोसिंग स्पाँडिलायटिस : सकाळी उठल्यानंतर पाठीच्या खालच्या भागात दुखणे आणि हिंडले-फिरले नाही तर बरे वाटते.

सिस्टॅमिक ल्यूपस अ‍ॅरिथिमॅटोटस : तोंड येणे, फुंशी होणे, ज्यात गालावर फुलपाखराप्रमाणेच रॅशेस येणे इत्यादींचा समावेश आहे. उन्हात ते वाढते, केस गळण्याची समस्या इत्यादी.
सोग्रेन सिंड्रोम : तोंडावर आणि डोळ्यात कोरडेपणा वाढणे आणि जबड्यावर सूज येणे.
स्क‌क्लेरोडर्मा : थंडीत हात व पायांच्या बोटावरील रंग बदलणे (रेनॉल्ड्स फिनॉमेनन) आणि कातडीत कडकपणा येणे.

संधिवाताची लक्षणे
१. हात, पाय, कंबर, खांदे, मानेजवळील सांध्यांत दुखणे, सूज आणि आखडणे.
२. रात्री सांध्याचे दुखणे वाढणे आणि सकाळी उठल्यानंतर सांधे अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ आखडणे.
३. दुखणे, सूज आणि आखडण्याचा प्रकार आराम केल्यानंतर वाढणे आणि काम करत असताना कमी होणे.
सांध्यावर परिणाम होणे : सांध्याच्या हालचाली मंदावणे, सांध्यामध्ये विकार उद््भवणे, कार्यक्षमता कमी होणे यामुळे कामासाठी दुसर्‍यावर विसंबून राहण्याची वेळ येते.

शरीरावर परिणाम : चेहरा आणि डोळ्यात कोरडेपणा, रक्ताची कमतरता, वजन घटणे, ताप येणे, थकवा, हृदयविकाराचा झटका येणे, हाडे ठिसूळ होणे.

उपचारांचा उद्देश : सध्या संधिवातावर उपचाराचा उद्देश ट्रीट टू टार्गेट आहे. यात टार्गेट रेमिशन असते. रेमिशनचा अर्थ आजारापासून मुक्त होणे. संधिवातावर उपचार शक्य आहेत. या आजाराला नियंत्रणात आणता येते. याला "विंडो ऑफ अपॉर्च्युनिटी' असे म्हणतात. उपचाराद्वारे रुग्णांचा संधिवाताच्या विकारापासून बचाव करता येतो. तसेच रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो.

उपचाराचे प्रकार : डिमार्ड (डिसीज मॉडिफाइंग अँटिरुमॅटिक ड्रग्ज) या औषधाद्वारे आजार रोखता येतो. ते दोन प्रकारचे असतात.

१. कन्व्हेशनल डिमार्ड (मिथोटेक्सेट, हायड्रोक्सी क्लोरोक्विन, सल्फासेलेजिन आणि लेफ्ल्युनोमाइड): संधिवाताचे निदान होताच डिमार्ड शक्य तितक्या लवकर सुरू करावे. यात मोनथेरपी (फक्त मिथोटेक्सेट) किंवा मल्टिपल कॉम्बिनेशन डिमार्ड, आजाराची गंभीरता पाहूनच सुरू केले जाते. रुग्णाला नियमितपणे तज्ज्ञ चिकित्सकास दाखवावे लागते. यामुळे संधिवात नियंत्रणात येते आहे की नाही, याची माहिती मिळते. मिथोट्रेक्सेट या औषधाचे वैशिष्ट्य असे की, याला आठवड्यातून एकदा घ्यावे लागते. या औषधात मिथोट्रेक्सेट अँकरशीट हे प्रमुख
औषध आहे. याच्याशिवाय उपचार अपुरा आहे. याची उपयुक्त मात्रा १५-२५ मिलिग्रॅम आठवड्यातून एकदाच असते.

बायोलॉजिकल डिमार्ड (इनफ्लिक्सिमॅब, इटरनॉसेप्ट, अ‍ॅडालिम्युमॅब, रिटुक्सिमॅब, अबाटासेप्ट) : बायोलॉजिकल ट्रीटमेंट खूप महाग असते, परंतु आता खूप बायोसिसिमिलरही उपलब्ध आहेत. ज्या रिसर्च केलेल्या औषधांपेक्षा खूप स्वस्त आणि तितक्याच परिणामकारकही आहेत. जेव्हा कन्व्हेश्नल औषधांनी आजार नियंत्रित होत नसेल, तेव्हाच बायोलॉजिकल औषधांचा उपयोग केला जातो.

उपचारावरून संभ्रम
१. अँटी कॅन्सर ड्रग आहे - होय. मिथेट्रेक्सेट औषधी कॅन्सरसाठीही वापरात आणली जाते, परंतु संधिवातात याचे प्रमाण खूप कमी असते. हे औषध दीर्घ काळासाठी सुरक्षित आहे.

२. संधिवाताची औषधे नुकसानदायी : या आजाराकरिता असलेल्या औषधांचे साइड इफेक्ट खूप जास्त आहेत. आजार आणि औषधाचे साइड इफेक्ट माहिती करून घेण्यासाठी तसेच योग्य निदान करता यावे
म्हणून वेळोवेळी रक्ताची तपासणी केली जाते. उपचार आणि औषधामुळे होणार्‍या साइड इफेक्टपासून बचाव करण्यासाठी तज्ज्ञांचा वेळोवेळी सल्ला घ्यावा.

संधिवातावर उपचार नाही : संधिवात रक्तदाब आणि साखरेच्या आजाराप्रमाणे औषधाद्वारे नियंत्रणात ठेवता येताे आणि याचा उपचार आयुष्यभर घ्यावा लागतो.

डॉ. राहुल जैन
संधिवात आजाराचे तज्ज्ञ, नारायण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, जयपूर
बातम्या आणखी आहेत...