आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ndia\'s US Envoy S Jaishankar Appointed New Foreign Secretary

भारतीय परराष्ट्र सचिवांची पत्नी जपानी, मुले अमेरिकेत, आई-वडील तामिळनाडूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. एस. जयशंकर, भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी नोकरशहाची असल्यामुळे बहुतांश वास्तव्य दिल्लीत राहिले आहे. ते तामिळ आहेत. आयएएस वडील के. सुब्रह्मण्यम फादर ऑफ इंडियन स्ट्रॅटेजिक थॉट्स म्हणून ओळखले जात होते. जेएनयूमध्ये शिकलेल्या जयशंकर यांच्या प्रवेशाची कथाही रंजक आहे. ते आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेले होते. मात्र, जेएनयूमध्ये मोठी गर्दी दिसल्याने प्रवेश घेऊन परत आले. पहिली पत्नी शोभाची त्यांची भेट इथेच झाली.

मोठा मुलगा ध्रुव अमेरिकेत एका थिंक टँकसोबत काम करत आहे. सून कसांड्रा अमेरिकन आहे. मुलगी मेधा लाॅस एंजलिसमधील चित्रपट उद्योगात आहे. पहिली पत्नी शोभा यांचा कॅन्सरने मृत्यू झाल्यामुळे जयशंकर यांनी जपानी वंशाच्या क्योको यांच्याशी विवाह केला. त्यांचा मुलगा अर्जुन दहावीत शिकत आहे. जयशंकर यांना इंग्रजी, हिंदी आणि तामिळशिवाय रशियन, जपानी आणि हंगेरियन भाषा येते. वयाच्या २४ व्या वर्षी ते आयएफएस अधिकारी झाले. २०१३ मध्ये अमेरिकेत राजदूत झाले तेव्हा त्यांच्यासमोर देवयानी खोब्रागडे प्रकरण आले. त्यांनी चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून दीर्घकाळ काम केले. निवृत्तीला ७२ तास शिल्लक असताना त्यांना अचानक विदेश सचिव करण्यात आले.

जन्म : ९ जानेवारी १९५५
शिक्षण : दिल्लीच्या स्टीफन्स कॉलेजमधून पदवी. जेएनयूमधून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि आंतरराष्ट्रीय संबंधांत एमफिल-पीएचडी
चर्चेत- त्यांची नुकतीच विदेश सचिवपदी नियुक्ती झाली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, मुलगा आणि मुलीचे फोटो...