आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या मैत्रीमुळे बारू बनले होते डॉ. मनमोहनसिंग यांचे सल्लागार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बारू
जन्म : 1954 मध्ये
कुटुंब : पत्नी रमा शिक्षका, मुलगी तन्विका
शिक्षण : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए व पीएच.डी. सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज, तिरुअनंतपुरममधून अप्लाइड इकॉनॉमिक्समध्ये एम.फिल.

चर्चेचे कारण : ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर : द मेकिंग अँड अममेकिंग ऑफ मनमोहनसिंग’ या पुस्तकात मनमोहनसिंग सरकारमध्ये सोनिया गांधी दखल देत असल्याचा आरोप केला.

बारू यांचे आजोबा महाराष्ट्रातील होते. मात्र, ते हैदराबादेत स्थायिक झाले. वडील बीपीआर विठ्ठल आंध्र प्रदेशचे वित्त सचिव होते. ते केंद्र-राज्य संबंधांतील तज्ज्ञ आहेत. त्यांनी काही काळ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये तज्ज्ञ म्हणून काम केले आणि 10 व्या नियोजन आयोगाचे सदस्यही होते. ज्या वेळी बारू यांचे वडील आंध्रचे वित्त सचिव होते, त्याच वेळी डॉ. मनमोहनसिंग दिल्लीमध्ये वित्त सचिव होते. 70 च्या दशकात डॉ.सिंग यांची बारू यांचे वडील आणि त्यांच्या सासर्‍यांबरोबर मैत्री होत. डॉ. बारू 90 च्या दशकाच्या सुरुवातीस डॉ.सिंह यांच्या जवळ आले. पुढे पंतप्रधानांनी त्यांना मे 2004 मध्ये आपले माध्यम सल्लागार म्हणून नियुक्त केले. बारू त्या वेळी फायनान्शियल एक्स्प्रेसचे चीफ एडिटर होते. बारू यांनी राजीनामा दिला. त्यानंतर ऑगस्ट 2008 पर्यंत ते पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार होते. बारू सांगतात, मी आर्थिक नुकसान होणार असूनही वडील आणि सासर्‍यांच्या सांगण्यावरूनच पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार बनण्याचे मान्य केले होते.

या पदावरून हटल्यानंतर सप्टेंबर 2008 मध्ये ते इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज (आयआयएसएस) शी संलग्न झाले. कन्सल्टिंग सीनियर फेलो म्हणून ते सेवेत रुजू झाले. एप्रिल 2012 पासून ते आयआयएसएसमध्ये जिओ इकॉनॉमिक्स अँड स्ट्रॅटेजीचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. बारू यांनी पूर्वी इकॉनॉमिक टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये असोसिएट एडिटर पदही सांभाळले आहे. ते नवी दिल्ली मध्ये इंडियन काउंसिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्समध्ये प्राध्यापक होते. पंतप्रधान कार्यालयात ते देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्यही होते. डॉ. मनमोहनसिंग यांच्या संदर्भात बारू यांनी केलेल्या लिखाणावर झालेल्या वादाबाबत बारू म्हणतात, राजकीय बंधने पाहता पंतप्रधानांनी चांगले काम केले आहे. ते महाभारतातील भीष्माप्रमाणे होते, धृतराष्ट्राप्रमाणे नव्हे. माझे पुस्तक यूपीए-1 च्या कार्यकालावर आहे. यूपीए-2च्या नाही. यूपीए-1 च्या कार्यकाळात पंतप्रधान निश्चितच डोळे मिटून बसलेले नव्हते.