आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...म्हणून तुमचे घर मुलांना वाटते एक गोंधळलेले जग!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वयात येणार्‍या म्हणजेच १३ ते १८ वय असलेल्यांना मुलांना कुटुंबात नेहमीच बोलणे खावे लागते. वेळ वाया घालवू नको, जबाबदार बन, कठोर परिश्रम कर आणि बरेच काही. जितकी जास्त बंधने तितकी जास्त ही मुले अधिकच चिडतात. या मुलांसाठी घरात गोंधळलेले वातावरण निर्माण होते. ते घरापासून दूर जाऊ लागतात.यातही काही रामबाण उपाय आहेत. त्यामुळे सारे व्यवस्थित होईल. त्याच काही टिप्स-

- एक काळ होता, जेव्हा बाबांनी सुटी घेतली की मुलांच्या आनंदाला पारावर उरायचा नाही. मात्र १३ वर्षांनंतर जेव्हा त्याला कळते की आई-बाबा आज ऑफिसला जाणार नाहीत तेव्हा कुणीतरी आपले स्वातंत्र्य हिरावून घेत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. याचे कारण म्हणजे मुलांच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात. यापैकी अनेक नव्या असतात. जसे मित्र, अभ्यास, समाज, शरीरातील बदल आणि बरेच काही. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणेच उत्तम. मात्र वेळोवेळी टाकून बोलणे योग्य नाही.

- या वयात आई-बाबा मुलाला विचारतात की तो काय काम करतोय? ते योग्य आहे की अयोग्य? इ. त्याच्यावर विश्वास टाकणे आणि मिळूनमिसळून वागणे उचित ठरेल.
- मुलांचे कौतुक करणे म्हणजे त्यांच्यासाठी फास्ट फूड सारखेच असते. त्यापेक्षा त्यांना मूल्यांप्रती सजग करा. त्यांना सांगा की ते काय आहेत. त्यामुळे आपण कोण आहोत हे त्यांना उमगेल.

- मुलांचे स्वत:चे जग असते. असे असले तरी ते आपल्याला काही सांगू इच्छितात. तुम्ही यासाठी तयार राहिले पाहिजे. एखादी गोष्ट त्यांना समजावायची असेल तर ती थेट सांगण्यापेक्षा समजावणीच्या सुरात सांगा. तुमच्याबाबतीत काय झाले होते, हेही आवर्जून नमूद करा.
डॉ. शैलजा सेन
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, फॅमिली थेरपिस्ट, दिल्ली.