आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्टार्टअप’ टेक्नोच असावे असेही नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडे ‘स्टार्टअप’ शब्द खूप वेळेस ऐकण्यात येतो आहे. अनेक जणांना याची कल्पनाही नाही. ज्या काळात डॉट कॉम कंपन्यांची जोरदार हवा निर्माण झाली त्या काळात हा शब्द आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरात येऊ लागला. स्टार्टअप म्हणजे तंत्रज्ञानासंबंधी काही गोष्टी असाव्यात असे काहींना वाटते. परंतु तसे नाही. स्टार्टअप तांत्रिक कंपनीच असावी, असेही नाही. त्यात काही नवीन असते. लोकांच्या समस्या सोडवणारी काही नवीन उपाययोजना, अशी एका स्टार्टअपची व्याख्या सांगता येईल. याच्या यशस्वितेची खात्रीही नाही.

स्टार्टअप आणि लहान व्यवसाय
स्टार्टअपची संकल्पना छोट्या व्यवसायापेक्षा वेगळी आहे. अमेरिकन स्मॉल बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे (एसबीए) मत असे की, लहान व्यवसाय एक किंवा काही लोकांचा असू शकतो. याचे कोणत्याही क्षेत्रात वर्चस्व नसते. स्टार्टअप प्रत्यक्षात आपल्या वैशिष्ट्यांमुळे संपूर्ण बाजारपेठेवर प्रभाव टाकू शकतो. हा लहानसा व्यापारच असतो. याचा उद्देश स्थानिक मार्केटवर आपली पकड ठेवून फायदा मिळवणे इतकाच आहे. स्टार्टअपमध्ये लोकांना अापली संकल्पना समजावयाची असते. स्टार्टअपसाठी काम करण्याची एक पद्धत आहे. तो त्याला स्केलेबल बिझनेस मॉडेल बनवतो. यादृष्टीने स्टार्टअपची तीन प्रमुख कार्ये असतात. एक- प्रॉडक्टच्या अनुषंगाने व्हिजन देणे आणि त्याची वैशिष्ट्ये सांगणे, दोन-तुमचे ग्राहक कोण आहेत ते जाणून घेणे आणि त्यांना अनुकूल ठरणारे बिझनेस माॅडेल बनवणे, वितरण कसे करणार? यावर विचार करणे. त्याचबरोबर कंपनीत पैशाची आवक कशा प्रकारे हाेईल याची व्यवस्था करणे. तीन - ग्राहकांच्या व्यवहारास अनुसरून आपले मॉडेल मजबूत करणे.
पैसे येतात कोठून?

एका स्टार्टअपमध्ये पैसे लावणार्‍या जवळच्याच व्यक्ती असतात किंवा बँकेकडून कर्ज घेऊन याची सुरुवात करता येते. स्टार्टअपमध्ये थोडे यश मिळाले तर बाहेरचे गुंतवणूकदार किंवा व्हेंचर भांडवलदार यात पैसा गुंतवण्यास तयार होतात. स्टार्टअप चालवणारे पब्लिक इश्यूही आणू शकतात. जसजसे लोक यात पैसे लावत जातात तसतसे स्टार्टअपमध्ये इक्विटी वाटली जाते. यात पैसे गुंतवणारी प्रत्येक व्यक्ती त्याची मालकच असावी असेही नाही. तथापि त्यांना प्रमोटर मानता येते. को-फाउंडर किंवा सहसंस्थापकांसाठी काही नियम नाहीत, परंतु आपली कंपनी सुुरू करणारे आणि यात रक्कम गुंतवणूक करणार्‍यांत अशा प्रकारचा करार झाल्यास त्याचे त्यांना को-फाउंडर मानले जाते.

हा अस्थायी काळ आहे का?
साधारणत: कोणताही स्टार्टअप तीन वर्षांत गतिमान होतो किंवा तो स्टार्टअप राहत नाही. पुष्कळ वेळा अधिग्रहण आणि विलयानंतर मोठ्या कंपनीत त्याचे रूपांतर होते. तथापि स्टार्टअप यशस्वी होतीलच याची खात्री देता येत नाही. तरीसुद्धा त्या स्टार्टअपची वैशिष्ट्ये त्याच्या ग्रोथ आणि इनोव्हेशनमध्ये दडलेली असतात. समजा, एखाद्याने एका शहरात रेस्तराँ उघडले आहे. त्याला स्टार्टअप मानले जात नाही. तो लहान व्यवसाय आहे.

भारतात स्टार्टअप
भारत जगात स्टार्टअप क्रांतीसंबंधात प्रमुख देश समजला जातो. न्यूयॉर्कमधील व्हंेचर कॅपिटल ट्रॅकर सीबी इनसाइट यांचे म्हणणे असे की, आठ भारतीय कंपन्यांचा समावेश १०७ ग्लोबल फर्ममध्ये सहभागी असून त्या युनिकॉर्न क्लबमध्ये आल्या आहेत. या कंपन्या १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहेत. यात ई-कॉमर्समधील दिग्गज कंपनी फ्लिपकार्ट असून या कंपनीने गेल्या काही वर्षांत २ अब्ज डॉलर उभे केले आहेत. यानंतर ई-टेलर स्नॅपडील असून अन्य कंपन्यांत, म्युसिग्मा (डाटा अ‍ॅनालिटिक्स फर्म), ऑनलाइन क्लासिफाइड सर्व्हिस क्विकर आणि मोबाइल अ‍ॅडव्हर्टाइझमेंट प्लॅटफॉर्म इनमोबी यांचा समावेश आहे. या सर्व कंपन्या एक अब्ज डॉलरहून अधिक भांडवल असलेल्या कंपन्या आहेत. मुंबईत ५०० स्टार्टअप्स असून यात अनेक गुंतवणूकदार रक्कम गुंतवत आहेत. मुंबईमध्ये हाउसिंग डॉट काॅम, क्लीअर ट्रिप, ओला आणि क्विकर अशी उदाहरणे आहेत.

स्टार्टअपला असे ओळखा
क्विकर बनवणार्‍या प्रणय चुलेट यांचे शिक्षण राजस्थानातील दरिबा गावात झाले. केंद्रीय विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. दिल्लीत आयआयटी केमिकल इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आयआयएम कोलकातामधून त्यांनी एमबीए केले. डॉट कॉमच्या काळात त्यंानी २००० मध्ये अमेरिकेत एक कंपनी सुरू केली. कंपनीचे नाव ‘रेफरन्स चेक’ असे होते. यात कंपनीकडून ऑनलाइन प्लंबरची सुविधा देण्यात येत होती. या कंपनीचे महत्त्व ओळखून वॉकर डिजिटल नावाच्या एका दिग्गज कंपनीने ती विकत घेतली. तेव्हा चुलेट यांनी २००८ मध्ये क्विकरच्या नावे स्टार्टअप सुरू केले. यात विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले. गेल्याच वर्षी अमेरिकेतील टायगर ग्लोबल या कंपनीने यात ६ कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे.

२०१५ मध्ये नाव कमावणारे क्राऊडफायर हे टि्वटर आणि इन्स्टाग्रामचे फ्रेंड मॅनेजमेंट अ‍ॅप आहे. क्राऊडफायर द्वारा एंटरप्रायजेस आपल्या इनेक्विट फाॅलोअर्सना ट्विटरवर पाहू शकतात. हा मोबाइल अ‍ॅप फॉलोअर्सना मॅनेज करण्यासाठी अनेक प्रकारे साहाय्यभूत ठरतो. यापैकी अनेक अ‍ॅप मोफत आहेत. कंपनीचे उत्पन्न ६ कोटींहून अधिक आहे. जगभरात याचे सुमारे ८० लाख युजर्स आहेत.

प्राइसबाबा नावाचे एक लोकल प्रॉडक्ट सर्च इंजिन आहे. हा अनेक स्थानिक आणि आॅनलाइन रिटेलर्सची संपर्क साधण्यासाठी ग्राहकांना मदत करतो. यात कोठून योग्य दरात वस्तू मिळतात ते अन्् त्याच्या किमतीही पडताळून पाहता येतात. यात कोणती वस्तू कोठून घ्यावी याची माहिती ग्राहकांना मिळते. नुकतेच चेन्नई, हैदराबाद, वडोदरा आणि सुरत या चार शहरांत हे काम सुरू झाले असून देशातील ११ शहरांत याची सुविधा आहे. अशा प्रकारे मुंबईच्या रिक्रुटमेंट अ‍ॅप सुपरला नुकतेच वायरलॅट्रिक्सने विकत घेतले असून नोकरीसाठी अर्ज करणार्‍यांना कंपन्यांशी जोडणे हा उद्देश यामागे आहे. आतापर्यंत ५ लाख लोकांनी यात नावे नांेदवली आहेत. अशा प्रकारे मुंबईचे वीज रॉकेट युजर वर्तणुकीचे विश्लेषण करणारे टूल स्टार्टअप असून हा युजर तुम्हाला केवळ शॉपिंगचे नोटिफिकेशन देताे असे नसून आभारही मानतो.

डॉ. शर्मिष्ठा शर्मा
सहयोगी प्राध्यापक, इन्स्टिट्यूट आॅफ इनोव्हेशन इन टेक. अँड मॅनेजमेंट, नवी दिल्ली.
बातम्या आणखी आहेत...