आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोंगाटाविरुद्ध एका डॉक्टरचा तीन दशके अथक लढा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. यशवंत त्र्यंबक आेक
वय - ८१ वर्षे
शिक्षण - मुंबई वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस
चर्चेत का - ३० वर्षांपासून हे ध्वनिप्रदूषणाविरुद्ध लढा देत आहेत.

काही दिवसांतच उत्सवांचा हंगाम सुरू होत आहे. न्यायालयाकडून ध्वनिप्रदूषणासंबंधी आदेश येण्याची भीती लोकांमध्ये आतापासूनच सुरू होईल. त्याची पूर्वतयारीही लोक करत आहेत. १९८५ पासून यासंबंधी आदेश येत आहेत. या आदेशांच्या मागे डॉ. यशवंत त्र्यंबक आेक यांचे प्रयत्न कारणीभूत आहेत. ध्वनिप्रदूषणाने ग्रस्त लोकांची कैफियत यांनी न्यायालयासमोर मांडली.

वैद्यकीय पदवी मुंबई मेडिकल कॉलेजमधून घेतल्यानंतर १९६१ मध्ये ते ब्रिटनला गेले.तेथे त्यांनी एनएचएस प्रतिष्ठानमध्ये काम केले. त्या काळात एनएचएससारख्या संस्थांमध्ये काम करणे अभिमानास्पद मानण्यात येत. ५ वर्षे तेथे राहून त्यांनी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला व प्रशिक्षणही घेतले. त्यानंतर ते मुंबईला परतले. विलेपार्ले येथे प्रॅक्टिस करू लागले. १९७९ मध्ये त्यांच्या ध्यानात आले की ध्वनिप्रदूषणामुळे रक्तदाब जडतो. जर्मन वैज्ञानिकाने यावर संशोधन केले होते. त्याच्याकडून डॉ. आेक यांनी दस्तएेवज मागवले. त्याच काळात त्यांच्या घरासमोर गिरणीच्या परिसरात एक आैद्योगिक युनिट उभारले. डॉ. आेकने यामुळे ध्वनिप्रदूषण होईल अशी तक्रार केली. लोकवस्तीच्या ठिकाणी हे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. अखेरीस त्या आैद्योगिक युनिटचा परवाना रद्द करण्यात आला. १९८५ मध्ये त्यांनी आपल्या डॉक्टर व वकील मित्रांसोबत मिळून गणेशोत्सवादरम्यान लावण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली. रात्री ११ नंतर ते बंद केले जावेत, अशी मागणी केली.

अखेरीस निर्णय डॉ. आेकांच्या बाजूने लागला. त्यानंतर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत प्रथमच ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर १ लाख रुपये दंड व ५ वर्षे कैद अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली. देशात अशा प्रकारचा कायदा अंमलात येण्याची ही पहिलीच वेळ होती.
त्यांच्याच याचिकेवर २००३ मध्ये ध्वनिप्रदूषणासाठी २००० च्या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...