आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जरी व सिल्कवर्कसह व्ही-डे बनवा खास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॅलेंटाइन-डे (व्ही-डे) हा पे्रम प्रकट करण्याचा दिवस. तुम्हाला जर लूक बदलायचा असेल तर फ्लोई जॉर्जेट, सिल्क किंवा जरी परिधान करा. किटरिन लेबलच्या डिझायनर पूनम बजाज यांनी व्हॅलेंटाइन-डेसाठी विशेष डिझाइन्स तयार केली आहेत. त्यांच्या डिझाइनमध्ये ट्रॅडिशनसह मॉडर्न टचही दिसून येतो. पूनम म्हणाल्या की, ही डिझाइन्स न्यू-एज वुमनच्या गरजा लक्षात घेऊन बनवली आहेत. ही डिझाइन्स मिक्स अँड मॅच करून कलर चॉइसनुसार परिधान करावीत.

पर्ल आणि स्टोन वर्कची डिझाइन्स
व्हॅलेंटाइन-डेनिमित्त ट्यूनिकची फॅशन असेल. यावर पर्ल आणि स्टोनवर्क जास्त दिसून येईल. हे ट्यूनिक टॉप टाइट पँट, फिटेड डेनिम, लेगिंग किंवा चुडीदारवर वापरता येतील. त्याशिवाय जरी कुर्ता आणि नी-लेंथ सिल्क ड्रेस पार्टीसाठी परिधान करावा. हा दिवस खास व्हावा म्हणून हे ड्रेसेस विविध रंग आणि स्टाइलमध्ये बनवले आहेत.

ड्रेसमध्ये ट्रॅडिशनल-इंडियन टच
इंडियन टेस्ट लक्षात घेऊन पूनम यांच्या व्ही-डे डिझाइनमध्ये ट्रॅडिशनल कशिदाकारी दिसून येईल. ड्रेसेसची किंमत सहा ते दहा हजारांदरम्यान आहे. त्यामुळे मुलींना ते सहज खरेदी करता येतील.

स्ट्रेट फिट कुर्त्यावर ब्रोच
व्ही-डेचा संबंध रेड कलरशी जोडला जातो. आपल्याला लाल रंग पसंत नसेल तर पर्पल, मरून, वाइन हे रंग छान दिसतील. शॉर्ट ड्रेसऐवजी स्ट्रेट-फिट कुर्त्यावर ब्रोच वापरता येईल.
व्ही-डेची पाच सुंदर डिझाइन्स
@ पर्पल वा रेड कलरमध्ये असिमिट्रिकल ट्यूनिक परिधान करा. यावर स्वरोस्की क्रिस्टल वर्क, पुढे व मागे अँटिक जरीवर्क आणि राउंड नेकवर दबका वर्क खुलून दिसेल. बाह्या लहान ठेवा. क्रेप लायनिंग द्या. साइड झिपने चांगली फिटिंग मिळेल.

@ मरून वा पर्पल कलरचा जॉर्जेट ट्यूनिक ड्रेसही परिधान करता येईल. ट्यूनिकपुढे प्लीट्स, राउंड नेक व छोट्या रफल्ड स्लीव्हज् छान दिसतील. योकवर स्ट्रिंग्ज वा फ्लोरल ब्रोच सुंदर दिसेल.

@ मरून आणि बेझ रंगाचा शिफॉन लेअर्ड ओम्बे्र शेड सूट परफेक्ट ड्रेस आहे. योकवर वर्क करता येईल. याच्या छोट्या रफल्ड स्लीव्हज चांगल्या दिसतात. या ड्रेसवर मॅचिंग चुडीदार पँट आणि दुपट्टा परिधान करता येईल.

@ सुंदर मरून रंगाचा जॉर्जेट लेअर्ड ट्यूनिक ड्रेसही परिधान करू शकता. या वेळी राउंड नेक छान दिसेल. बाही छोटी ठेवा. समोर प्लीट द्या. योकवर कशिदाकारी केल्यास ड्रेसला मॉडर्न लूक मिळेल.

@ पिंक कलरचा जॉर्जेट असिमिट्रिकल ट्यूनिक आहे. गळ्याभोवती सिल्व्हर जरीवर्क आणि चायनीज कॉलरसह प्लेकिट छान दिसेल. फ्रंटवर जरीवर्क, क्रिस्टल आणि पर्ल कशिदाकारीसह के्रप लायनिंग यात खुलून दिसेल.
अस्मिता अग्रवाल
20 वर्षांपासून फॅशन रायटिंगमधील
प्रसिद्ध नाव, नवी दिल्ली