आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक ऋतूत घालण्याजोगे खास फॅब्रिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंतरराष्ट्रीय वूलमार्क पुरस्कार विजेता टेक्स्टाइल डिझायनर राहुल मिश्र यांनी डिझायनिंग क्षेत्रात यापेक्षाही मौल्यवान योगदान दिले आहे. या पुरस्कार स्वरूपात त्यांना मोठ्या रकमेसह पॅरिस, मिलान इत्यादी देशांतील अरमानी, गॉडची अँड गबाना आणि डोना कॅरनसारख्या प्रसिद्ध फॅशन स्टोअर्सशी चांगले संबंध स्थापन करण्याची संधीही मिळाली. हा पुरस्कार मिळाल्याने राहुल स्वत:ला भाग्यवान समजतात.

वूलमार्क पुरस्कार मिळाल्याचा आनंद वर्णन करताना राहुल म्हणाले की, हे सर्व माझ्यासाठी स्वप्नवत आहे. माझा जन्म लहानशा गावात झाला. इंडियन टेक्स्टाइलची परंपरा असल्यामुळे एखादे नवे डिझाइन तयार करण्याची कल्पना खूप आवडली.

राहुल यांनी नुकतीच त्यांच्या लेबलचा सहावा वर्धापन दिन साजरा केला. यानिमित्त आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते अँथनी लाऊ यांचा ड्रीम व्ह्युअर्स हा चित्रपट दाखवला. 25 मिनिटांच्या या लघुपटात वूलमार्क विजेत्या पाचही स्पर्धकांची यशोगाथा दाखवण्यात आली.

राहुल यांनी वूल आणि जर्सीच्या मिश्रणातून एक अद्भुत फॅब्रिक तयार केले आहे. या फॅब्रिकचे वैशिष्ट्य म्हणजे लोकर ही साधारणत: हिवाळ्यात वापरली जाते, मात्र यापासून तयार केलेले ड्रेस उन्हाळ्यातही परिधान करता येतील. राहुल सांगतात, हे फॅब्रिक अतिशय मऊ असून यातील बांधणी धुतल्यानंतर मोकळी होत नाही. स्वत:चाच एक अनुभव सांगताना ते म्हणाले, एनआयडीच्या दुसर्‍या सेमिस्टरमध्ये डिझायनिंग सोडून देण्याची इच्छा झाली होती. मात्र, पत्नीने (त्या वेळची मैत्रीण) मनाई केली. राहुल यांनी 2006 मध्ये प्रथम मुंबईत येऊन 2008 मध्ये ब्रँड लाँच केला. मास्टर्स डिग्री घेतल्यानंतर त्यांनी हा ब्रँड लाँच केला.
(फोटो - कल्की कोचलिनसह डिझायनर राहुल मिश्र)

अस्मिता अग्रवाल
20 वर्षांपासून फॅशन क्षेत्रातील लिखाणासाठी प्रसिद्ध नाव, नवी दिल्ली.