आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ड्रोन विमानांचे रहस्यमय विश्व

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोटी-मोठी ड्रोन विमाने उडवल्यानंतर हे किती आधुनिक आणि अनोखे तंत्रज्ञान आहे याची जाणीव होते. ड्रोन केवळ एक शस्त्रच नाही. तुम्ही जेव्हा याची पद्धती पाहता, कारवाई करता तर तुम्ही याचे असणे जगात आहे असे समजा. ज्याप्रमाणे इंटरनेट तुमच्या मेंदूला चालना देतो त्याचप्रमाणे ड्रोन तुमच्या शरीर आणि इंद्रियांच्या क्षमतेचा विस्तार करते. स्मार्ट फोन, थ्रीडी प्रिंटिंगसोबतच ड्रोन मागील दहा वर्षांत नव्याने उदयाला आलेले पर्यायी तंत्रज्ञान आहे.

ड्रोनने अमेरिकी सैन्याचे रुपडे पालटले आहे. दहा वर्षांपूर्वी अमेरिकी संरक्षण विभाग पेंटागॉनच्या ताफ्यात 50 ड्रोन होती. आता 7500 आहेत. सैन्याने अफगाणिस्तानात 2012 पूर्वीच्या 11 महिन्यांत 447 ड्रोन हल्ले केले होते. 2011 मध्ये यांची संख्या 294 होती. ओबामा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानवर 300 गुप्त ड्रोन हल्ले केले. ड्रोन नेहमीच युद्धभूमीवर तैनात असते. ते आपली गुप्त माहिती जमवते आणि त्वरित कारवाई करते. त्याने युद्ध पद्धतीच बदलली आहे. ते आता असैनिक क्षेत्रातील बदलांसाठी तयार आहे. वर्षभरापूर्वी राष्ट्राध्यक्ष ओबामांनी फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफएए)ला मनुष्यविरहित हवाई वाहन म्हणजेच ड्रोनला नागरी विमान घडामोडींशी जोडण्याचे आदेश दिले. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिस त्याचा वापर करतील. शेतकरी ड्रोनच्या माध्यमातून शेताची निगा राखतील. बिल्डर कन्स्ट्रक्शन साइटचे सर्वेक्षण करतील. चित्रपट निर्माण क्षेत्रात त्याचा वापर होईल. हे छंदी लोकांनाही उपयोगी पडेल. ड्रोन अत्यंत शक्तिशाली, विध्वंसक तंत्रज्ञान आहे. हे जिथे जाते तिथे नवीन नियम लिहिते.

यशस्वी अभियान - आकड्यांनुसार अमेरिकेचे ड्रोन अभियान अत्यंत यशस्वी ठरले आहे. वॉशिंग्टनच्या न्यू अमेरिका फाउंडेशननुसार अमेरिकी ड्रोन हल्ल्यात अल् कायदा, तालिबानचे 50 प्रमुख नेते मारले गेलेत. अफगाणिस्तानात सैन्यातर्फे ड्रोन हल्ले केले जातात. ते बहुतांश उघडउघडपणे केले जातात. दुस-या ठिकाणी ते ‘सीआयए’तर्फे केले जातात आणि गोपनीय असतात. ब्रिटनची संस्था ‘ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझम’च्या अंदाजानुसार 2004 पासून एकट्या पाकिस्तानात ‘सीआयए’च्या ड्रोन हल्ल्यात 2629 ते 3461 व्यक्ती मारल्या गेल्या. यात 475 ते 891 नागरिकांचा समावेश आहे.

अंतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, अमेरिकेच्या ड्रोन अभियानाची घटनात्मकता तिखट वादविवादाचा विषय आहे. दहशतवादविरोधी अभियानाचे प्रमुख जॉन ब्रेनन आणि अधिका-यांच्या मते ‘9/11’ हल्ल्यांसाठी जबाबदार लोक आणि त्यांच्या सहका-यांविरोधात 2001 मध्ये बळाचा वापर करण्यासाठी अधिकृत केले गेले होते. यानुसार, ड्रोन हल्ले वैध आहेत, परंतु टीकाकारांच्या मते, सरकार 2001 च्या स्वीकृतीच्या पुढे गेले आहे. संयुक्त राष्ट्राच्या विशेष वार्ताहराने लिहिले आहे, अमेरिका ज्याप्रमाणे लोकांना कुठेही ड्रोन विमानांनी लक्ष्य करत आहे त्याप्रमाणे इतर देशांनीही करण्यास प्रारंभ केल्यास अराजकता माजेल.

काहीही असो, ड्रोन गूढ तर आहेच. ते नवीन प्रकारची अस्वस्थता निर्माण करतात. त्यांचे नेहमीच तुमच्यावर लक्ष असते. ते अल कायदा, तुमचे सरकार, मित्र किंवा शेजारीही असू शकतात. प्रश्न निर्माण होतो लोकांवर लक्ष ठेवणे, त्यांना टिपण्याशिवाय ड्रोन चांगल्या कामात उपयोगी ठरू शकते का?

अमेरिकी सीमाशुल्क आणि सीमा विभाग मेक्सिको सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी 2005 पासून ड्रोन विमानांचा वापर करते. मागील वर्षी नासाने ग्लोबल हॉक ड्रोनच्या माध्यमातून नदीने नावाच्या वादळाचा अभ्यास केला होता. ओबामा प्रशासनाने ड्रोनचा वापर वाढवण्याच्या कायद्यांना मंजुरी दिली आहे. ड्रोन उडवण्याची परवानगी मागणा-यांमध्ये विद्यापीठ, सार्वजनिक संस्था आणि ड्रोन निर्मात्यांचा समावेश आहे. ज्याप्रमाणे 1970 च्या शतकात खासगी संगणकाचा वापर मर्यादित होता, त्याचप्रमाणे सध्या विद्यापीठांची प्रयोगशाळा आणि छंदी लोक ड्रोन उडवतात, परंतु ड्रोन उद्योगांना विश्वास आहे -उपयोगावर लागलेले निर्बंध हटवण्यात आले की चित्र पालटेल.

मागील वर्षी लास वेगासमध्ये ड्रोन विमानांच्या ट्रेड शोमध्ये 500 कंपन्यांनी ड्रोनच्या उपयोगाविषयी चौकशी केली होती. दुस-या देशांत असैनिक कार्यांमध्ये ड्रोनचा वापर होत आहे. ब्रिटिश कंपनी स्कायपॉवरने 8 रोटरचे ड्रोन तयार केले आहे. जो मुव्ही कॅमेरा घेऊन जातो. कॉस्टारिकात ज्वालामुखीच्या अभ्यासासाठी याचा उपयोग होतो. जपानमध्ये त्यांच्या माध्यमातून पिकांवर शिंपले जाते. ड्रोनच्या वापरासोबत अनेक चिंताही जोडल्या गेल्यात. ते मोठ्या संख्येने अपघातग्रस्त होतात. ब्लूमबर्ग अहवालानुसार, हवाई दलाच्या ताफ्यात ग्लोबल हाक, प्रिडेटर आणि रीपर सर्वाधिक आघातग्रस्त होणारे ड्रोन आहेत. सरकारी जबाबदारी कार्यालया(जीएओ)च्या एका अहवालानुसार, ड्रोन विमानांची अविश्वासार्हता, कमकुवत इलेक्ट्रिक सुरक्षा आणि हवेत दुस-या विमानांशी टक्कर टाळण्याच्या क्षमतेवर चिंता व्यक्त केली आहे.

अहवालात ड्रोन विमानांनी संकलित केलेल्या खासगी माहितीविषयीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ड्रोन हेरगिरी करणारे आतापर्यंतचे सर्वाधिक शक्तिशाली शस्त्र आहे. हवाई दलाच्या गोरगॉन सेन्सरने तैनात रीपर ड्रोन एकावेळी 12 विविध कोनातून जवळपास चार किलोमीटर क्षेत्रावर लक्ष ठेवते. पेंटागॉनच्या एका संस्थेतर्फे विकसित आरगस इमेजिंग सिस्टिम वीस हजार फूट उंचीवरून सहा इंच लांब वस्तूचे छायाचित्र घेऊ शकतो.

यामुळे अमेरिकेच्या काही राज्यांत ड्रोनच्या घरगुती वापरावर कायद्याचे नियंत्रण यासारख्या उपायांवर विचार केला जात आहे. ड्रोनच्या माध्यमातून एखाद्याच्या बेडरूममध्ये डोकावणे बेकायदेशीर आहे; परंतु कुणी ना कुणी असे करणारच. ते स्वस्त होत आहेत. त्यांना चालवणे सोपे बनत आहे. ते तंत्रज्ञान स्वरूपात अधिक सक्षम बनले आहेत. ड्रोन स्वत: विचार करण्यास शिकत आहेत.

पेन्सिल्वेनिया विद्यापीठातील ड्रोन हवेत सोडल्यानंतर स्वत:च मार्ग शोधतात. ड्रोन तंत्रज्ञान निश्चितच सैन्यातून असैनिक क्षेत्रात प्रवेश करेल. ते शहरात पिझ्झा घेऊन जातील. देशांच्या सीमा ओलांडत औषधे पोहोचवतील. फरार गुन्हेगारांना जेरबंद करतील आणि नामवंत लोकांच्या शयनकक्षात डोकावतील. तेव्हा काय होईल जेव्हा 2675 रुपये आणि आयफोन बाळगणारा एखादा व्यक्ती ड्रोन चालवू शकेल. स्टेनफोर्ड आणि न्यूयॉर्क विद्यापीठाच्या लॉ स्कूलने 130 पाकिस्तानी नागरिकांच्या मुलाखत घेत त्याआधारे ‘ड्रोनच्या सावलीत जीवन’ हा अहवाल तयार केला आहे.

यात इस्लामाबादची एक व्यक्ती म्हणते, ड्रोनचे सावट नेहमीच माझ्या मनावर असते. यामुळे झोपणेही कठीण आहे. ते एखाद्या डासासारखे आहेत. तुम्ही त्यांना पाहू शकत नाहीत. मात्र, त्यांना ऐकू शकता. तूर्तास तरी केवळ अमेरिका मोठ्या प्रमाणावर ड्रोन चालवते. ही स्थिती बदलेल. अंदाजानुसार 76 देश ड्रोन तयार करत आहेत. हिजबुलला आणि हमास यासारख्या संघटनांनी ड्रोनचा वापर केला आहे.

आपल्या शत्रूंचा नायनाट करण्यासाठी अमेरिकेत ड्रोन हल्ला करण्याचा दावा एखाद्या देशाने केला तर काय होईल? ड्रोन आपल्याला केवळ शक्तीच प्रदान करत नाहीत तर ते आपल्याला त्याचा वापर करण्यासाठीही प्रवृत्त करतात.

काळानुरूप बदलत्या ड्रोन विमानांची माहिती वाचण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...