आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रॉपआऊट बंधूंनी स्थापली ऑनलाइन पेमेंट कंपनी स्ट्राइप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉन कॉलिसन आणि पॅट्रिक कॉलिसन दोघेही ड्रॉपआऊट आहेत. मोठा भाऊ पॅट्रिक एमआयटीतून तर छोटा जॉन हार्वर्डमधून. शिक्षण मधेच सोडून दोघांनी ऑनलाइन पेमेंट कंपनी स्ट्राइप २०११ मध्ये स्थापन केली. आयर्लंडमध्ये यांचा जन्म झाला. सध्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये स्थायिक आहेत. येथे त्यांच्या कंपनीचे मुख्यालय आहे. आज ही कंपनी अंदाजे ६ अब्ज डॉलर्सची जागतिक कंपनी आहे. ही
केवळ सुरुवात आहे.

स्ट्राइपपूर्वी दोघांनी एक कंपनी सुरू करून विकली आहे. किशोरवयात काम सुरू केले. या कंपनीचे नाव ‘ऑटोमॅटिक’ असे होते. ही ऑनलाइन लिलाव साइट होती. ही कंपनी त्यांनी लाइव्ह करंट मीडियाला ५ दशलक्ष डॉलर्समध्ये विकली होती. पॅट्रिकला लहानपणी भेटवस्तू म्हणून कॉम्प्युटर मिळाले होते, असे जॉन सांगतात. त्यानेच आपल्याला कोडिंग शिकण्यात मदत केली. आयर्लंडच्या ग्रामीण भागात राहत असल्याने शिकण्यासाठी वाव नव्हता. मात्र संकेतस्थळांवर प्रोग्रॅमिंग शिकण्याची सोय असल्याने त्यांना शिकता आले. त्यांनी कोडिंगचे बारकावे शिकून घेतले. इंटरनेटमुळे ते जगाशी जोडले गेले. हे शिक्षण महत्त्वाचे ठरले. न्यूयॉर्कमध्ये असतो तर हा अनुभव घेता आला नसता, असे ते सांगतात.

जॉन सांगतात - मी १६ वर्षांचा आणि पॅट्रिक १८ वर्षांचा असताना त्यांनी ऑटोमॅटिक ही कंपनी स्थापली. आयर्लंडमध्ये ऑनलाइन ऑक्शनसाठी प्रभावी कंपनी नव्हती. ईबे होती पण मर्यादित स्वरूपात. त्यामुळे ‘ऑटोमॅटिक’ कंपनी उभारली. एका वर्षात ती विकली. शिक्षणासाठी अमेरिकेत आलो. मी हार्वर्ड तर पॅट्रिकने एमआयटीत प्रवेश घेतला. सुट्यांमध्ये ‘स्ट्राइप’साठी काम सुरू केले. २०१० चा हा काळ. पॅट्रिक बऱ्याच साइड प्रोजेक्टवरही काम करत होता. वेबवर पेमेंट स्वीकारणे इतके कठीण का, यावर ते विचार करत होते. त्याला सोपे बनवण्यासाठी दोघांचे प्रयत्न सुरू होते. सहा महिने त्यांनी यावर काम केले. नंतर तयार केलेला प्रोटोटाइम मित्रांना दाखवला. त्याचा वापर सोपा झाल्याविषयी पडताळणी केली. याच्या बाजाराची व्याप्ती त्यांना माहीत नव्हती. वापरकर्त्यांसाठी हे किती सोयीचे झाले आहे याची जाणीवही नव्हती. यात फसवणुकीविरुद्ध गतिरोध मजबूत आहे का हे सिद्ध व्हायचे होते. कंपनीने पेमेंट कंपन्यांशी करार केला. आपल्या पेमेंट स्टार्टअपला विश्वासार्ह बनवण्यासाठी पॅट्रिक आणि जॉन यांनी पूर्णवेळ यालाच दिला. जॉन कंपनीचे अध्यक्ष तर पॅट्रिक सीईआे. इतर ऑनलाइन कंपन्यांची मर्यादा होती. ते व्यक्ती ते व्यक्ती आणि ग्राहकांसाठीच सेवा देत, असे पॅट्रिकने सांगितले. बिझनेससाठी संरचनात्मक पायाभरणीवर नियंत्रण हवे. ही कंपनी ग्राहकांच्या गरजा पूर्ण करेल का, याविषयी साशंकता होतीच. कंपनीची वाढ गतीने होईल का, हादेखील प्रश्न होता. त्यांचा उत्साह अनेक वेळा या विचारांनी मावळत असे. अनेक लोकांना याचा उपयोग होईल असे आपल्याला वाटत होते. वित्तपुरवठा उद्योगात याचा किती स्वीकार होईल याचा अंदाज नव्हता. मात्र कंपनी सुरू करण्यापूर्वीच अमेरिकन बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिस कंपनी वेल्स फार्गो आणि अमेरिकन एक्स्प्रेसने सोबत काम करण्यास सहमती दर्शवली. कंपनी सुरू झाल्यानंतर अनेक वित्तीय संस्था जोडल्या गेल्या. सध्या ३० देशांत स्ट्राइप सक्रिय आहे. ९ देशांत कंपनीचे कार्यालय आहे. अत्यंत प्रतिकुल परीस्थितीतून यांनी इंटरनेटचा वापर करत नवी संकल्पना जगाला दिली.
बातम्या आणखी आहेत...