आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drought In Maharashtra Political Leaders Tour In Drought Area

कुजबुज: ठाकरे-देशमुख भेटीचे गूढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात नवनिर्माण करू पाहणार्‍या मनसेचे नेते राज ठाकरे लातूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. ते सध्या राज्यात सगळीकडेच फिरत असल्यामुळे आणि लातूरमध्ये त्यांची सभा नसल्यामुळे त्यांच्या या दौर्‍याकडे फारसे कुणाचे लक्ष नव्हते. मात्र ते ज्या विश्रामगृहात थांबले होते त्याच विश्रामगृहात गृहराज्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचाही मुक्काम होता. त्यातच दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव तथा लातूरचे आमदार अमित पालकमंत्र्यांना भेटायला म्हणून विश्रामगृहावर गेले. त्याच वेळी राज ठाकरे आपल्या कक्षाबाहेर पडत होते. दोघांची समोरासमोर भेट झाल्यानंतर एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केले. मग अमित देशमुखांनी या पाव्हण्याला चहा प्यायची आॅफर केली. राज ठाकरे यांनीही ती सहजपणे स्वीकारली. त्यानंतर हे दोघे सतेज पाटलांच्या कक्षात गेले आणि तिघांनी अर्धा तास गप्पा मारत चहापान केले. या तिघांच्या भेटीने राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मात्र चांगलाच जळफळाट झाला. शरद पवार आणि अजित पवारांना लक्ष्य करणार्‍या राज ठाकरेंना सत्तेत भागीदार असलेल्या काँग्रेसचे मंत्री, आमदार भेटतातच कसे, असा सवाल विचारत राष्ट्रवादीने या दोघांचा निषेध केला. त्या भेटीत काहीच राजकीय चर्चा झाली नाही, असे ठाकरे आणि देशमुखांनी सांगितले असले तरी या भेटीचे संदर्भ पुढच्या निवडणुकीपर्यंत काढले जातील. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी अमित आणि रितेश देशमुख या विलासरावांच्या मुलांशी आपली 20 वर्षांपासून मैत्री असल्याचे जाहीरपणे सांगितले. मात्र त्याचा राजकारणावर परिणाम होणार नाही. भविष्यात लातूरमध्ये मनसे वाढलेलीच पाहायला मिळेल, असेही जोर देऊन सांगितले. आता मनसेचे कार्यकर्ते त्यांनी जाहीरपणे सांगितलेले गृहीतक मान्य करतात की भेटीमागचे कवित्व उगाळत बसतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

ब्ल्यूप्रिंटला उशीर का? वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

अनिल पौलकर, समाधान पोरे, धनंजय एकबोटे