आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका ट्विटमुळे मिळाली नोकरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रयान ग्रेव्स, संस्थापक कर्मचारी उबेर - Divya Marathi
रयान ग्रेव्स, संस्थापक कर्मचारी उबेर
रयान ग्रेव्स यांना उबेरने सर्वात प्रथम नियुक्त केले होते. जानेवारी २०१० ची त्यांची नियुक्ती असून त्या वेळी उबेर सुरू होऊन वर्ष झाले होते. काम सुरू झाले. टॅक्सी सेवेचा पथदर्शी प्रकल्प सुरू होता. उबेरचे सीईओ ट्रेव्हिस कॅलेनिक आपल्यासाठी सहकाऱ्यांच्या शोधात होते. त्यांनी प्रॉडक्ट मॅनेजरचा शोध घेत असल्याचे ट्विट केले. काही टिप्स द्याल का? असे त्यांनी ट्विटरवर विचारले होते. या टि्वटला रयान ग्रेव्सने उत्तर दिले. हे उत्तर होते, ‘ हिअर इज ए टिप. ई-मेल मी.’ त्यासोबत त्यांनी ई-मेल आयडी टाकला. या आत्मविश्वासपूर्ण ट्विटने रयानचा अब्जाधीश होण्याचा प्रवास सुरू झाला. आज रयानची एकूण संपत्ती १.५८ अब्ज डॉलर्स आहे. उबेर सध्या ६८ अब्ज डॉलर्सची कंपनी झाली आहे. उबेरची स्पर्धा अमेरिका, ७० देशांतील विविध टॅक्सी सेवांशी आहे.  

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रयान यांनी कंपनीचे अध्यक्षपद सोडले. सध्या ते कंपनीचे रेसिडेंट आंत्रप्रोन्योर आणि बिल्डर म्हणून काम करत आहेत. उबेरमध्ये येण्यापूर्वी रयान यांना जनरल इलेक्ट्रिकमध्ये डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून कामाचा अनुभव होता. त्यापूर्वी ते फोरस्क्वेअर कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंटचे काम करत होते. २००८ मध्ये जीई हेल्थ केअरमध्ये डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करत. हे काम प्रसिद्धी मिळवून देणारे नव्हते. एकाच कंपनीत २० वर्षे काम करावे असा माझा पिंड नव्हता. येथे आयुष्यभर काम करण्यासारखे काम होते. मात्र शेवटी एक मनगटी घड्याळ देऊन सेंड-ऑफ, इतकाच याचा शेवट होता. जीईमध्ये असताना त्यांनी स्टार्टअप सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र यश मिळाले नाही. २००९ मध्ये त्यांनी फोरस्क्वेअरमध्ये इंटर्नशिपसाठी अर्ज केला. हे पूर्णवेळ काम नव्हते. त्यांना स्वत:ला सिद्ध करायचे होते. ते दिवसभर जीईमध्ये काम करत आणि सायंकाळी फोरस्क्वेअरसाठी. ते शिकागोच्या लोकांची भेट घेत. फोरस्क्वेअरचे लाभ त्यांना सांगत. 

अॅप किती उपयुक्त आणि प्रभावी आहे याविषयी माहिती देत. नव्या ग्राहकांची यादी त्यांनी फोरस्क्वेअर आणि गुंतवणूकदारांना पाठवली. त्यानंतर बिझनेस डेव्हलपमेंटची पूर्णवेळ जबाबदारी त्यांना मिळाली. त्यांनी नेटवर्किंगला आपले बलस्थान बनवले. त्यांनी स्टार्टअप इंडस्ट्रीच्या लोकांसोबत नेटवर्किंग वाढवले. अधिकाधिक लोकांच्या संपर्कात राहण्याचा ते प्रयत्न करत. त्यामुळेच ट्रेव्हिस कॅलेनिकचे ट्विट ते पाहू शकले. कॅलेनिक सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करत आहेत याची माहिती त्यांना होती. रयानच्या लक्षवेधी ट्विटमुळेच कॅलेनिक यांनी त्यांना ई-मेल पाठवला. दोघांची भेट झाली. सोबत काम करण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांनी उबेर कॅब सेवा सुरू झाली. रयान कंपनीत सीईओ झाले. रयान म्हणतात की मला नशिबाने ही संधी दिली. मी कठोर परिश्रम करण्यास तयार होतो. मला संधीदेखील चालून आली. 
 
१ मार्च हा रयान यांचा उबेरमधील पहिला दिवस होता. पहिल्या दिवसापासूनच मोठ्या उत्साहाने ते कामाला लागले. कॅलेनिकने रयानविषयी एका मुलाखतीत सांगितले की, स्टार्टअपच्या तरुण उद्योजकांसोबत मी अनेकदा काम केले आहे. मात्र रयानसारखा कामाचा दर्जा इतरांचा नव्हता. समस्यांना सोडवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. भावनिक चातुर्य प्रचंड आहे. पहिल्या दिवशीपासून कामाचा उरक होता. दर आठवड्यात आम्ही १५ ते २० तास प्रॉडक्ट्स, ड्रायव्हर्स, प्रायसिंग मॉडेल यावर काम करत.त्यांनी स्टार्टअपचा गेम वेगाने आत्मसात केला. सॅनफ्रान्सिस्कोसहित अनेक ठिकाणी सेवा त्यांनी  सुरू केली. यशाचा काही फॉर्म्युला नाही, असे रयान सांगतात. कंपनीचे हित कशात आहे, हा मूलभूत प्रश्न विचारून काम करणे उत्तम.  
बातम्या आणखी आहेत...