आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य : जंक फूडमुळे पीसीआेएस आणि कर्करोगाचा धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चरबीयुक्त आहार, व्यायामाचा अभाव, जंक फूड यामुळे वजन झपाट्याने वाढते. अत्याधिक चरबीमुळे अॅस्ट्रोजन हार्मोनचे प्रमाण वाढते. त्यामुळे बीजांडकोशाजवळ गळू निर्माण होते. त्यामुळे तुम्ही पीसीआेएससारख्या आजारांना बळी पडू शकता.

जंक फूड तरुणींसाठी धोकादायक आहे. जंक फूडमध्ये असणाऱ्या चरबीतील कोलेस्टेराॅलचे प्रमाण उच्च असते. अतिसाखर व मिठाचा वापर यात होतो. अति उष्मांक असल्याने व साखरेमुळे स्थूलता वाढते. कोलेस्टेरॉल, मीठ असल्याने उच्च रक्तदाब, आघात, हृदयाचे विकार बळावतात. अत्याधिक मिठामुळे मूत्रपिंडाची कार्यक्षमता प्रभावित होते.
जंक फूडचे अधिक काळ सेवन केल्यास अशक्तपणा येतो. चरबी साठल्यामुळे रक्ताभिसरण क्रिया मंदावते. जड वाटते व अस्वस्थता वाढते. व्यक्ती एकाग्र होऊ शकत नाही.
महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या उद््भवण्यास पॉलिसिस्टिक आेव्हरियन सिंड्रोम (पीसीआेएस) हे प्रमुख कारणांपैकी एक आहे. यामुळे गळू निर्माण होते. वेळीच उपचार झाले नाहीत तर हा आजार कर्करोगात परिवर्तित होतो. सध्या जंक फूडची चलती आहे. त्यामुळे स्थूलताही वाढते आहे. पीसीआेएसच्या समस्याही वाढत अाहेत.

जवळपास १० % महिलांना किशोरवयात पीसीआेएसची समस्या उद््भवते. ही समस्या महिलांना रजोनिवृत्तीपर्यंत त्रासदायक ठरू शकते. पीसीआेएसची समस्या असलेल्या महिलांच्या अंडाशयात हार्मोनची निर्मिती सामान्यपेक्षा अधिक असते. त्यामुळे बीजांड गळू किंवा गाठीत बदलले जातात. त्याचे रूपांतर कर्करोगात होते. जर सुरुवातीला उपचार मिळाले नाहीत तर महिलांना मधुमेह टाइप टू जडतो. अत्याधिक कोलेस्टेरॉलची समस्याही असू शकते.
वजन घटवल्यामुळे या आजाराला नियंत्रणात ठेवता येते. ज्या महिला आजारी असताना वजन घटवतात त्यांच्या गर्भाशयात पुन्हा बीजांड निर्मिती सुरू होते. व्यायाम करणे यासाठी अत्यावश्यक आहे. तेलकट, मीठयुक्त, चरबीयुक्त आहार घेणे टाळा. तणावमुक्त राहा.
बातम्या आणखी आहेत...