छायाचित्र: आई, वडील आणि मोठ्या भावासोबत दृष्टी हरचंदराय
महाराष्ट्रातील ११ वर्षांच्या दृष्टी हरचंदरायने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेऊन सर्वांनाच चकित केले. दृष्टीने आता पंतप्रधान होण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. दृष्टीने फडणवीस यांना पत्र लिहून मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांनी ती पूर्ण केली.
दृष्टीचा जन्म २७ एप्रिल २००३ रोजी मुंबईत झाला. ती जेपी पेटिट हायस्कूलमध्ये पाचवी इयत्तेत शिकत आहे. तिचे वडील-दलीप हरचंदराय व्यावसायिक आहेत. आई बानी गृहिणी, तर मोठा भाऊ निर्वाण हरचंदराय दहावीत शिकत आहे. दृष्टी अभ्यासाव्यतिरिक्त वाचन, नृत्य, संगीत ऐकण्यात वेळ घालवते. दृष्टी
नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे पंतप्रधान, पत्रकार किंवा इस्रोमध्ये शास्त्रज्ञ होऊ इच्छिते.
दृष्टीने सांगितले की, घरात नव्या मुख्यमंत्रिपदाबाबत बरीच चर्चा होत होती. एकेदिवशी शाळेत वरिष्ठ अधिका-यांना पत्र लिहिण्यास सांगितले. त्या वेळी तिने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली.