आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका व्यक्तीच्या पुढाकारामुळे दरवर्षी जगभर साजरा हाेताे वसुंधरा दिन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२२ एप्रिल राेजी एक अब्जाहून अधिक लाेकांनी ‘वसुंधरा दिन’ साजरा केला. ४७ वर्षांपूर्वी अमेरिकेत त्याची सुरुवात झाली हाेती. मानवी समुदायाने अापल्या ग्रहाच्या संदर्भात विचार करावा अाणि त्यास अधिक हानी पाेहाेचणार नाही, असे काम करावे हा दृष्टिकाेन समाेर ठेवण्यात अाला हाेता. अमेरिकी राज्य काेलाेरॅडाेच्या असेंब्ली भवनासमाेरील हे छायाचित्र अाहे, लाेकांनी इथे सायकल फेरी काढून जगाला पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला हाेता.
 
- वसुंधरा दिन २०१६ ची उपलब्धी : अमेरिका, चीनसह १२० देशांनी एेतिहासिक पॅरिस जलवायू करारावर शिक्कामाेर्तब केले हाेते. ज्यामध्ये २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात अाले हाेते. 
 
- जग एकवटले : अाता १९३ पेक्षाही अधिक देशांमध्ये वसुंधरा दिन साजरा केला जाताे. सामान्य लाेक वृक्षाराेपण करून हिरवाई संवर्धनाच्या प्रयत्नांना बळ देत अाहेत. मुळात पृथ्वीवरील वातावरण अधिक चांगले राखण्याचा सर्वांचा प्रयत्न अाहे. 
 
- २०१७ ची संकल्पना : पर्यावरण अाणि वातावरण साक्षरता हे अाहे, मुलांना या संकल्पनेशी जाेडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात अाले अाहे. कारण भविष्यात तेच नेतृत्व करणार अाहेत, येत्या काळात ते अधिक चांगले काम करू शकतील. २०२० मध्ये वसुंधरा दिनास ५० वर्षे पूर्ण हाेतील, त्या अनुषंगाने तयारीदेखील सुरू झाली अाहे. 
 
- वसुंधरा दिनाचा उद्देश : अापले खाद्यान्न अापणच निर्माण करायचे किंवा प्रादेशिक खाद्य सामग्री विकत घ्यायची, दस्तएेवजामध्ये कागदपत्रांचा कमीत कमी वापर, वृक्षाराेपण, बाटलीबंद पाण्याची खरेदी बंद करणे, कारपुलिंगला प्राेत्साहन देणे किंवा सायकलचा वापर अाणि साैर ऊर्जेच्या वापराला गती देणे.
 
- १९६९ मध्ये सेन्टा बार्बरा, कॅलिफाेर्नियाच्या समुद्रकिनाऱ्यावर कच्च्या तेलाचा तवंग पसरल्यानंतर माजी खासदार गेलाॅर्ड निल्सन यांनी दरवर्षी वसुंधरा दिन साजरा करण्याची घाेषणा केली हाेती. 
बातम्या आणखी आहेत...