आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Earth Hour: Millions To Switch Off Lights Around The World

‘वसुंधरे’साठी आज द्या एक तास!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसुंधरेच्या संरक्षणासाठी जगभरात चिंता व्यक्त केली जात असून काही आशादायक प्रयत्नही सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून वैश्विक पातळीवर वसुंधरेसाठी एक तास अशा संकल्पनेतून ‘अर्थ अवर’ मोहीम राबवली जात आहे. आज शनिवारी होणार्‍या या मोहिमेत सहभागी होऊन एक तास विजेच्या वापराला फाटा द्यायचा आहे. त्यानिमित्ताने घरातच ‘कँडल लाइट’ डिनर करण्याची संधी आपल्याला मिळेल. वीजनिर्मितीद्वारे सर्वाधिक प्रदूषण होत आहे. म्हणून विजेची बचत हीच निर्मिती असल्याने पिक अवरमध्ये एक तास वीज वापराला फाटा देण्याची ही मोहीम आहे. जागतिक तापमानवाढ, वातावरण बदल यासारख्या वैश्विक समस्यांना तोंड देण्यासाठी अत्यंत परिणामकारक ठरलेल्या या मोहिमेत सहभागी होणार्‍यांची संख्या दरवर्षी कोट्यवधींनी वाढते आहे.

कशासाठी अर्थ अवर ?
वाढती लोकसंख्या आणि विस्तारात विजेची मागणी प्रचंड वाढत आहे. प्रदूषणाचा कहरही वाढतोच आहे. कार्बन डायऑक्साइड, मिथेन यासारखे ग्रीन हाऊस गॅस वातावरणात मिसळण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे. त्यामुळे वातावरणावर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष कृतीद्वारे जगभरातील नागरिकांना अर्थ अवर मोहिमेत वसुंधरेच्या संरक्षणासाठी सहभागी करून घेतले जात आहे.