आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूर्वी एका खोलीत व्हिडिओ गेम विक्री, आता सर्वात मोठी ईबे सेलर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिंडा लाइटमॅन, आंत्रप्रेन्योर
वय- ५३ वर्षे
शिक्षण : अमेरिकेत कायद्याचा अभ्यास
कुटुंब : पती फ्रेड, दोन मुले
चर्चेत : ईबे वेबसाइटच्या २० व्या वर्धापनदिनी त्या अव्वल विक्रेत्याच्या रूपात पुढे आल्या.

एका किरकोळ स्टोअरला एक अब्ज ६६ कोटी रुपये वार्षिक विक्रीचा गड बनवणार्‍या लिंडा लाइटमेन पेनसिल्व्हेनियाच्या फिलाडेल्फियाच्या रहिवासी आहेत. त्या ईबेच्या अडीच कोटी विक्रेत्यांमध्ये सर्वोत्कृष्ट मानल्या जातात. १५ वर्षांपासून त्या आपले स्टोअर लिंडा स्टाफच्या नावाने चालवत आहेत. दोन अपत्यांची आई असलेल्या लिंडाने सर्वात आधी व्हिडिओ गेम विकण्याचे काम सुरू केले होते.

एक सामान्य गृहिणी अशा पद्धतीने कशा काय वस्तू विकू शकते याचे नवल लोकांना वाटले. एवढेच नव्हे तर त्यांनी न्यूयॉर्कमध्ये लेबर व एम्प्लॉयमेंट अ‍ॅटर्नी म्हणूनही काम केले होते. यानंतर त्यांनी कपडे, बूट आणि अन्य अ‍ॅसेसरीजचीही विक्री सुरू केली. तेव्हा ५३ वस्तू विकणार्‍या लिंडा आता दररोज ५००० वस्तूंची विक्री करतात. वस्तू विकण्याच्या आधी त्यासंबंधी खूप अभ्यास केला जातो, असे त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेत ईबेवर दर दोन सेकंदांनी बुटांची एक जोडी, तर दर चार सेकंदांनी एक सेलफोन विकला जातो. त्यांच्या म्हणण्यानुसार, ईबेवर कोणता ना कोणता ग्राहक खरेदीसाठी उपलब्ध असतो. उत्पादने विकण्यासाठी वेबसाइटवर कशा पद्धतीने चित्रे टाकली पाहिजेत हे त्यांना चांगले समजते.

त्यांनी घरातील एका खोलीतून कामास सुरुवात केली हेाती आणि आता संपूर्ण घर सामानाने व्यापले आहे. काम वाढत गेल्यामुळे त्यांना गेल्या सात वर्षांत चार वेळा कार्यालय बदलावे लागले. पहिल्यांदा ५००० चौ. फुटांचे घर घेतले. यानंतर १२ हजार चौ.फूट आणि त्यानंतर २५ हजार चौ. फूट आणि शेवटी नवीन घर ९३ हजार चौ. फुटांचे घ्यावे लागले. लिंडा यांचे भाग्य २००३ मध्ये बदलण्यास सुरुवात झाली. त्यांच्या वस्तूंची विक्री या काळात वाढू लागली. यामुळे पती फ्रेडही लिंडाच्या कार्यालयात काम करू लागले. यानंतर २५ वर्षांचा मुलगाही जोडला गेला. त्यामुळे याला कौटुंबिक व्यवसायाचे स्वरूप आले. दुसरा मुलगा जोनाथन न्यूयॉर्कमध्ये एका खासगी इक्विटी कंपनीत काम करत आहे.