आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठरावीक उत्पन्नासाठी कोठे आणि किती पैसा गुंतवावा?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किती रक्कम कोठे गुंतवावी, यालाच अॅसेट अॅलोकेशन असे म्हणतात. मुदत ठेव, एनएससी आणि ईपीएफला सुरक्षित इन्कम प्लॅन असे म्हटले जाते. गुंतवणुकीची ही पारंपरिक पद्धत आहे. टॅक्स आणि महागाई पाहता डेट फंड्सचा परतावा या पर्यायांच्या तुलनेत जास्त चांगला असतो. जाणून घेऊया-
अॅसेट अॅलोकेशनमध्ये मुदत ठेवी, एनएससी, ईपीएफ आणि पीपीएफ यांना पारंपरिक पद्धत मानले जाते. हा काही खास वर्गातील लोकांनाच आवडतो. परंतु डेट म्युच्युअल फंड्स गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलियोस अनेक पर्याय देऊ शकतो. येथे काही पद्धती देण्यात आल्या आहेत, त्यावरून कोणकोणत्या डेट फंडात किती रक्कम गुंतवायची याची माहिती देण्यात आली आहे.

डेट फंडांचे प्रकार
१) ओपन एंडेड फंड्स - इक्विटीप्रमाणेच ही ओपन एंडेड स्कीम असते. यात वर्षभर गुंतवणूकदार खरेदी-विक्री करू शकतात. यात अल्ट्रा शाॅर्ट टर्म फंड्स, शाॅर्ट टर्म फंड्स, इन्कम फंड्स, गिल्ट फंडस, एमआयपी हे सर्व या प्रकारातीलच असतात. यात पैसे गुंतवल्यानंतर वेगळा दर आकारला जात नाही. परंतु मुदतीपूर्वी पैसे काढल्यास काही दर लावण्यात येतो.

२) क्लोज्ड एंडेड फंड्स : अशा प्रकारच्या स्कीममध्ये एका ठरलेल्या मर्यादेपर्यंत रक्कम गुंतवली जाते. यातून पैसे काढण्यासाठी एकच मार्ग आहे. जेथे त्यांची नोंदणी असते, त्या स्टॉक एक्स्चेंजमधून पैसे काढता येतात. कारण गुंतवणूकदार यातून मुदतीपूर्वी कधीही पैसे काढू शकत नाहीत.

पारंपरिक पद्धतीने मुदत ठेवी, एनएससी इत्यादींचा पर्याय चांगला वाटतो. कारण यात एक ठरावीक रक्कम मिळते. परंतु कर आणि महागाई परताव्यास नामशेष करतात. जी मंडळी जास्त कर भरतात, त्यांना कमी परतावा मिळतो. डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांना दोन फायदे मिळतात.

१) कर : अशा प्रकारच्या फंडात कर कमी लागतो. लाँग टर्म कॅपिटल गेन आणि डिव्हिडंड टॅक्स आयकराच्या तुलनेत कमी होतो. २०१४ मध्ये टॅक्सेशनच्या नियमातील बदलानंतर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटवर परिणाम झाला आहे. कर लागल्यानंतरसुद्धा हे फंड चांगला परतावा देत आहेत.

२) परतावा - तुम्हाला पैशाची गरज कधी भासते, याचे आकलन आणि जोखीम जाणून घेतल्यानंतर गिल्ट किंवा इन्कम फंडात पैसे गुंतवले पाहिजेत. यामुळे महागाईच्या परिणामापासून दूर राहाल.

डेट स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा कोणताही फाॅर्म्युला ठरलेला नसतो. अनेक गुंतवणूकदार शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. परंतु म्युच्युअल फंडात करत नाहीत. त्याऐवजी ते मुदत ठेवीत पैसे गुंतवतात. मग डेट स्कीममध्ये अॅलोकेशन कशा प्रकारे झाले पाहिजे? पीपीएफ आणि ईपीएफ दीर्घ कालावधीसाठी चांगला पर्याय आहेत. ईपीएफ नोकरीवर अवलंबून असते. दीर्घ कालावधीसाठी गिल्ट फंडात पैसे गुंतवणे योग्य ठरते. काही गिल्ट फंड तर १० वर्षांसाठी १० टक्क्यापर्यंत परतावा देतात. जर ईपीएफ नसेल तर ते फंड डेट पोर्टफोलिआेसाठी चांगला पर्याय असतील. दीर्घ कालावधीसाठी उद्दिष्ट म्हणून निवृत्तीनंतर चांगला पर्याय ठरतो.
याशिवाय एमआयपी आहे. यात इक्विटी विकत घेता येते. साधारणत: नियमित उत्पन्नासाठी यावर विचार करता येईल. परंतु हेसुद्धा डेट अॅलोकेशनसाठी योग्य ठरतात. क्लोज एंडेड फंड्ससाठी उदा. एफएमपी मध्यम अवधीची उद्दिष्टे पूर्ण करण्याचे एक साधन आहे. यात सर्वात मुदती ठेवीच्या तुलनेत चांगला परतावा मिळू शकतो. शॉर्ट टर्म फंड्स किंवा मनी मार्केट फंड्स अल्पावधीतील गरजा पूर्ण करण्यासाठी चांगला पर्याय ठरतील. शिवाय आणीबाणीच्या वेळीही ते चांगले आहेत.

या डेट स्कीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे पैसे गुंतवले जाऊ शकतात. तेव्हा आयुष्यभर एमआयपी किंवा एफएमपीमध्ये अॅलोकेशन वाढणे सुरक्षित मानले जाते. प्रौढांना आपल्या गरजेनुसार अॅलोकेशन करावे लागते.
(लेखक, सेबीचे अधिकृत गुंतवणूक सल्लागार व फायनान्शियल प्लॅनिंग गिल्ड ऑफ इंडियाचे सदस्य आहेत.)