आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभ्यास, शिक्षण मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी उत्तम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक देशांमध्ये साक्षरता कार्यक्रमावर विशेष खर्च केला जातो. अभ्यास व सतत शिकवण्याची वृत्ती मेंदूसाठी चांगली असते, हे अनेकांना माहीत नसते. युरोपमधील मेंदूतज्ज्ञ स्टेनिलास हेडाने यांनी फ्रान्सची राष्‍ट्रीय संस्था डी ला सांते अ‍ॅट दी ला रिसर्च मेडिकलमधील आपल्या सहका-यांसमवेत यासंदर्भात संशोधन केले आहे. त्यातील निष्कर्षात उतारवयातील शिक्षण प्रौढ व्यक्तींसाठी हितकारक ठरते. यासाठी फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजे एफएमआरआयमार्फत 63 प्रौढांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये 10 साक्षर होते, 22 प्रौढ वाचायला शिकले आणि 31 जण लहानपणीच वाचायला शिकले होते.

ज्यांना वाचायला येत होते, त्यांच्या मेंदूने लिहिलेल्या शब्दांना जोरदार प्रतिसाद दिला. दृष्टी व बोलण्याशी संबंधित मेंदूचा डाव्या बाजूचा भाग या प्रक्रियेत सक्रिय होतो. वाचन व लिखाणाची विद्या 5000 वर्षे प्राचीन आहे, असे या शास्त्रज्ञांनी सांगितले. वाचायला येत असेल तर मेंदूत एक सर्किट तयार होते, त्यातून बोलल्या जाणा-या भाषेला होकार मिळू लागतो. मेंदूमध्ये जिथे माहिती पोहोचते, तिथे काही सिग्नल असतात. मुलगा जसाजसा शिकतो, तशा मेंदूत काही गोष्टी वाढायला लागतात आणि हा बदल आरोग्यासाठी चांगला असतो.