आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्यागोत्यात वाटली गेली 41 तिकिटे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारणात प्रत्येक पक्षात घराणेशाहीची स्पष्ट परंपरा दिसत आहे. काँग्रेसने 1967 पासून ही परंपरा सुरू केली. भाजपदेखील मागे राहिली नाही. प्रादेशिक पक्षही तसेच. आतापर्यंच ज्या पक्षांत नातेवाइकांत तिकिटे वाटली गेली नाहीत, त्यात राष्ट्रीय पातळीवर डावे पक्ष आहेत. प्रादेशिक पातळीवर अण्णा द्रमुक आहे. एकूण 41 जागा नातेवाइकांमध्ये वाटून घेण्यात आल्या आहेत.

- संदीप दीक्षित (शीला दीक्षित यांचे पुत्र)
- दीपेंदर (भूपिंदर हुड्डाण यांचे पुत्र)
- सचिन पायलट (राजेश पायलट यांचे पुत्र)
- साकेत (विजय बहुगुणा यांचे पुत्र)
- भारतसिंह (माधवसिंह सोळंकी यांचे पुत्र)
- तुषार चौधरी (अमरसिंह चौधरी यांचे पुत्र)
- नीलेश राणे (नारायण राणे यांचे पुत्र)
- प्रशांत देशपांडे (आर. व्ही. देशपांडे यांचे पुत्र)
- कार्ती (चिदंबरम यांचे पुत्र)
- हमदुल्ला सईद ( लोकसभेचे उपसभापती दिवंगत पी एम सईद यांचे पुत्र)
- लक्ष्मणसिंग (दिग्विजयसिंह यांचे बंधु)
- प्रिया दत्त (सुनील दत्त यांची कन्या)
- सागर मेघे (दत्ता मेघे यांचे पुत्र)
- गौरव गौगौई (तरुण गोगोई यांचे पुत्र)
- मिलिंद देवरा (मुरली देवरा यांचे पुत्र)
- टीआरएसप्रमुख चंद्रशेखर राव यांनी कुटुंबातच तीन तिकिटे दिली.
- कन्या के. कविता, पुतण्या हरीश राव, के. चंद्रशेखर राव, पुत्र रामा राव

- एच. डी देवेगौडा व त्यांचे पुत्र कुमारस्वामी दोघे निवडणूक रिंगणात आहेत.
- मीसा भारती (लालू यांची कन्या), राबडी देवी (लालू यांच्या पत्नी)
- महबुबा मुफ्ती (पक्षप्रमुख मुफ्ती मुहंमद सईद यांच्या कन्या)
- मुलायमसिंह स्वत: दोन जागांवर उमेदवार आहेत. सोबत सून डिंपल आणि भाचे धर्मेंद्र यादव देखील निवडणूक लढवत आहेत.
- गोपीनाथ मुंडे बीडमधून लढत आहेत. भाची पूनम वडिलांच्या मतदारसंघातून मैदानात आहे.
- अमरिंदर यांच्या पत्नी परनीत अगोदरच काँग्रेसच्या उमेदवार होत्या. आता त्याही अमृतसरमधून मैदानात.
- मेनका गांधी, वरुण गांधी
- दुष्यंतसिंह (मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पुत्र)
- जयंत (यशवंत सिन्हा यांचे पुत्र)