आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॉयलॉनसारख्या पॉलिमरची भेट दिली जगाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्फोटके बनवण्यापासून सुरुवात करणार्‍या डू पाँट या अमेरिकन कंपनीने लोकांचे जीवन सहज केले. या कंपनीने रोजच्या वापरातील रिऑन, नायलॉन, सेलोफ्रेम, ऑरलोन, ल्यूसाइट, न्यूप्रिन, टेफ्लॉन, लाइक्रा आणि फेरॉनसारखे सिंथेटिक पॉलिमर्स जगाला सर्वात आधी दिले. त्याचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले. जगातील तिसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी केमिकल कंपनी त्याचबरोबर औद्योगिक रसायने, औषधी, कॉस्मेटिक आणि ल्युब्रिकंटसह अनेक प्रॉडक्शन या कंपनीची देण आहे.

मूळचे फ्रान्समध्ये राहणारे ऐल्युथेरे डू पाँट यांना अमेरिकेत व्यवसायाच्या अनेक चांगल्या संधी दिसून आल्या. विशेषत: बंदुकीची पावडर बनवण्याचा व्यवसाय चांगला चालेल याची त्यांना अपेक्षा होती. 19 जुलै 1802 मध्ये वेलीमिंग्टनजवळ ब्रँडीवाइन क्रीकमध्ये बंदुकीची दारू बनवण्याचा कारखाना सुरू केला. त्यानंतर दोन वर्षांनी त्याचा व्यवसाय सुरू केला. कंपनीकडून सर्वात जास्त पुरवठा अमेरिकन सैन्याला होत होता. 1834 मध्ये पाँट हे फिलाडेल्फियामध्ये व्यवसायानिमित्त गेले होते. त्यावेळी हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. 1857 मध्ये कंपनी औद्योगिक उद्योगांसाठी पहिले स्फोटके बनवले. त्यास सोडा पावडर नाव दिले. 1880 मध्ये डायनामाइडचे उत्पादन केले. त्यानंतर अनेक लहान उद्योगांचे अधिग्रहण केले.

एकाधिकार संपवण्यासाठी खटला : अमेरिकी एक्स्पोसिव्ह इंडस्ट्रीमध्ये एकाधिकारशाही होती. त्यामुळे 1907 मध्ये कंपनीने एंट्री ट्रस्टअंतर्गत खटला दाखल केला. त्यामुळे 1912 मध्ये हरक्यूस पावडर आणि अ‍ॅटलस पावडर नावाने दुसरी कंपनी स्थापन करावी लागली. 1914 मध्ये ऑटोमोबाइल उद्योगात गुंतवणूक केली. जनरल मोटर्सचे 25 दशलक्ष डॉलरमध्ये शेअर्स घेतले.

1915 मध्ये नायट्रोसेल्युलोज प्लास्टिक बनवले : 1915 पर्यंत कंपनीने नायट्रोसेल्युलोज प्लास्टिक बनवण्याच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 1917 मध्ये अनेक फार्मा कंपन्यांचे अधिग्रहण करून पेंट्स, अ‍ॅसिड्स आणि हेवी केमिकल्स बनवणे सुरू केले. 1920 मध्ये कंपनीने सिंथेटिक पॉलिमर्सचे संशोधन करून इतिहास निर्माण केला. सर्वात आधी सिंथेटिक रबर, न्यूप्रिन कंपनीने बाजारात आणले. लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. दुसर्‍या देशातही मागणी वाढली. 1938 मध्ये नायलॉनचे उत्पादन सुरू केले.

सीड व ऑइल क्षेत्रातही अव्वल : कंपनीची प्रॉडक्ट लाइन बदलली होती. त्यामुळे त्याला कॉर्पोरेट मॅनेजमेंटमध्येही अनेक बदल करावे लागले. 1802 ते 1940 पर्यंत कंपनीचे सर्व प्रमुख डू पाँट परिवाराचे सदस्य होते. त्यानंतर कंपनीत काही बदल झाले नाहीत.
संस्थापक : ऐल्युथरे इरेन डू पाँट
स्थापना: 1802
महसूल: 35 बिलियन डॉलर (2013)
मुख्यालय: विलमिंग्टन (डिलावारे), अमेरिका