आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेकशाहीच्या आयुष्यातील सर्वात वाईट कालखंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली हा जनमानसावरील हल्ला हाेता. भाषण, लेखन स्वातंत्र्यासारखे घटनात्मक अधिकार काढून घेण्यात आले हाेते. विनाकारण देशभरातील दीड लाखांवर लाेकांना तुरुंगात डांबण्यात आले हाेते, यात विराेधी पक्षाच्या कार्यकर्ते, नेते, बुद्धिवादी यांसह सामान्यांचाही समावेश हाेता. पंतप्रधान असतानाही अलाहाबाद न्यायालयाने गांधी यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदीचे दिलेले आदेश आणि देशातील आर्थिक अरिष्ट हे यामागील मूळ कारण मानले जात असले तरी इंदिराजींकडून देशातील आर्थिक अरिष्टाच्या निर्माण झालेल्या परिस्थितीचे कारण दिले जात हाेते. जनतेच्या कल्याणासाठी व देशातील गैरव्यवहार संपविण्यासाठी ही आणीबाणी असल्याचे त्या सांगत हाेत्या. म्हणूनच त्यांनी वीस कलमी कार्यक्रमही या काळात जाहीर केले, पण त्याचीही तुलना हिटलरच्या कार्यक्रमांशी हाेती. आर्थिक अरिष्ट लाेकांच्या खांद्यावर ढकलण्यासाठी ही आणीबाणी लादल्याची भावना जनतेत हाेती.

नाशिकमध्ये म्हणाल तर या एकाेणावीस महिन्यांत दहशतीचेच वातावरण हाेते. त्या काळात मी एलआयसीत कामगार नेता म्हणून काम करीत हाेताे. एलआयसीतील बदली कामगारांना नाेकरीत कायम करावे म्हणून आंदाेलन करणार हाेताे. मात्र असे आंदाेलन करू नये याकरिता पाेलिस आमच्यावर दबाव टाकत हाेते. या एकाेणावीस महिन्यांच्या कालावधीत काहीच करता येत नव्हते, विशेषकरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांना जास्त जाच सहन करावा लागला. वृत्तपत्रांतूनही या दडपशाहीच्या काहीच बातम्या येऊ नयेत याकरिता आचारसंहिता लावण्यात आली हाेती. त्यामुळे देशात काय सुरू आहे, काहीच कळत नव्हते. नाशिकमध्ये जयप्रकाश नारायण यांची सभा असाे की रात्री साडेअकरा वा. सुरू झालेली मृणाल गाेरे यांची सभा असाे, पन्नास-पन्नास हजारांची गर्दी त्याला लाेटायची. तीन-तीन तास लाेक शांततेत भाषण एेकायचे. याचा फटका मात्र इंदिरा गांधींना आणीबाणीनंतर जाहीर केलेल्या िनवडणुकीत बसला त्यांच्या पक्षाला सपाटून मार खावा लागला.
बातम्या आणखी आहेत...