आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसिकदृष्ट्या मजबूत असलेले लोक संकटसमयी काय करतात? जाणून घ्या!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षण * अडचणीच्या काळात खंबीरपणा महत्त्वाचा
मानसिकदृष्ट सक्षम असलेल्या लोकांची काळ नेहमीच परीक्षा घेत असतो. कठीण समयी तुम्ही काय करता एवढ्यावरच तुमच्या मानसिकतेची सक्षमता सिद्ध होत नाही, तर तुम्ही त्या वेळी कोणत्या गोष्टी करत नाही हेसुद्धा तेवढेच महत्त्वपूर्ण ठरत असते. थॉमस एडिसन याचे एक सर्वात चांगले उदाहरण आहे. १९१४ मध्ये त्यांच्या कंपनीमध्ये आग लागली होती. या आगीमध्ये सर्वकाही भस्मसात झाले. त्यांनी निर्माण केलेले नवीन प्रॉडक्टचे काही प्रोटोटाइपही या आगीमध्ये जळून खाक झाले. त्यांचे २३ मिलियन डॉलरचे नुकसान झाले. एवढे मोठे नुकसान झाल्यानंतरही एडिसनच्या प्रतिक्रियेत कोणत्याही प्रकारची निराशा दिसून आली नाही. त्यांनी म्हटले की, देवाच्या कृपेने आमच्या सर्व चुका या आगीत जळून राख झाल्या आहेत. आता आम्ही नव्या दमाने कामाला सुरुवात करू शकतो. त्यांची ही प्रतिक्रिया त्यांच्या मानसिक सक्षमतेच दर्शन घडवते. अशाच क्षमता काही लोकांना इतरांपासून पुढे घेऊन जातात. जाणून घेऊया मानसिकदृष्ट्या सक्षम असलेले लोक संकटाच्या काळात काय करतात आणि काय करत नाहीत ते...
लक्ष्य निश्चितीमुळे नकारात्मकता येत नाही : मेंटली टफ असलेल्या लोकांना कोठे फोकस करायचे आहे, हे चांगल्याप्रकारे माहीत असते. त्यांना अनुभव शिकवत असते, की संकटाच्या काळात समस्यांवर फोकस केल्यास निगेटीव्ह इमोशन्स आणि तणावाच्या घेऱ्यात फसू शकतो. ज्याचा कामावर परिणाम होण्याची शक्यता असते. या उलट ते लोक अडचणींवर तोडगा काढण्यावर लक्ष केंद्रीत करण्यास प्राधान्य देतात. तसेच ते आता यापुढे काय करायचे याचा विचार करतात. त्यामुळे सकारात्मकता येते व यामुळेच त्यांच्या कामात सुधारणा होते. ते केलेल्या चुकांपासून धडा घेऊन नव्या कामाचा प्रारंभ करण्याकडे वळतात.

आपल्या स्थानी ठाम राहत असल्याने पराभवाची भीती नाही : मानसिकदृष्ट्या सक्षम लोक यावेळी ठाम राहतात, ते अपयशी होऊन मागे हटत नाहीत. ते कोणती सुविधा नाही किंवा शारीरिक थकवा आला आहे या कारणानेही थांबू शकत नाहीत. त्यांच्या कामाची निश्चित अशी कोणतीच वेळ नसते. ते तोपर्यंत काम करतात जोपर्यंत ते पूर्ण होत नाही. ते सातत्याने आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून राहतात. संकटाच्या समयी त्यांची ही भावना आणखी शक्तीशाली होते. ते अपयशालाकडेही पराभव म्हणून पाहत नाहीत. ते लोक काय म्हणतील याकडेही लक्ष देत नाहीत. ज्यावेळी कोणी त्यांना असे म्हणतो की की तुम्ही हे काम करू शकत नाही तर ते समजतात की ते केवळ एका व्यक्तीचे मत आहे. त्यामुळे त्यांना फारसा फरक पडत नाही.

पश्चात्ताप करत नसल्याने विश्वास कायम राहतो : सर्वात वाईट गोष्ट आपल्या कृत्यावर पश्चाताप करणे. स्वत:ला दोष देण्याने व्यक्तीचा त्यांच्यावरील विश्वास डळमळीत होतो. या माध्यमातून हे सिद्ध होते की परिस्थितीपुढे व्यक्ती असहाय्य झाला असून परिस्थितीचा सामना तो करू शकत नाही. मानसिकदृष्ट्या सक्षम लोक कधीच पश्चाताप करत नाहीत. कारण याचा अर्थ आपल्या ताकदवर भरवसा नसणे असा होतो. त्यामुळे ते कधीही माफीची अपेक्षा ठेवत नाहीत.

आवडीचे काम करत असल्याने थकवा येत नाही : ते लोक आपल्या कामाची जबाबदारी दुसऱ्यांच्या हातामध्ये सोपवत नाहीत. आपला कामातील आनंद हा सदैव आपल्याच हातात ठेवतात. ते लोक काहीसुद्धा करताना आनंदाने करतात. ते कोणाच्या सांगितल्याने तत्काळ आपले विचार बदलत नाहीत.

त्यांना माहित आहे की लोकांची प्रतिक्रिया ही क्षणीक राहते. कधी हा विचार अपुऱ्या माहितीवर असतो आणि नेहमीच बदलत राहता. बौद्धीकदृष्ट्या सशक्त असलेले लोक आपल्या तुलना कोणासोबत करत नाहीत. ते केवळ आपल्या कामामध्ये व्यस्त राहतात.
बातम्या आणखी आहेत...