आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Energy Drink Is Dangerous For Teenagers And Childrens

किशोरवयीन,लहान मुलांसाठी एनर्जी ड्रिंक्स धोकादायक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत जवळपास ५०% तरुण एनर्जी ड्रिंक पितात. त्यापैकी ३१% नियमितपणे एनर्जी ड्रिंक प्राशन करतात. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. जर्नल ऑफ न्यूट्रिशन एज्युकेशन अँड बिहेवियरमध्ये मार्च २०१५मध्ये प्रकाशित अहवालानुसार, टीव्हीवर एनर्जी ड्रिंक्सची ४६% जाहिरात एमटीव्ही, फ्यूज आणि बीईटीसारख्या तरुणांमध्ये प्रसिद्ध वाहिन्यांवर दाखविली जाते. अमेरिकेत २०१९ पर्यंत एनर्जी ड्रिंक्सचा वार्षिक खप १६८६ अब्ज रुपये असण्याचा अंदाज आहे. इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या उसळीबरोबर चिंताही वाढली आहे की, एनर्जी ड्रिंक्स लहान मुले आणि तरुणांसाठी सुरक्षित आहेत का? जनहित सायन्स सेंटरने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) एनर्जी ड्रिंकच्या बाटल्यांवर धोक्याची सूचना देणे बंधनकारक केले आहे. खासदार एडवर्ड मार्के, डिक डर्बिन आणि रिचर्ड ब्लूमेंथलने अल्पवयीनांसाठीच्या विपणनावर बंदी आणायला सांगितली आहे. अमेरिकन बालरोगतज्ज्ञ अकॅडमीचे म्हणणे आहे की, मुले आणि तरुणांच्या आहारात एनर्जी ड्रिंक्सना कुठलेही स्थान नाही. त्यांचा तर्क आहे की, अनेक एनर्जी ड्रिंक्समध्ये नैसर्गिकरीत्या गरजेचे गुराना आणि जिनसेंगसह अन्य दोन अधिक शक्तिवर्धक तत्त्व असतात. माहिती नाही की, ही सर्व तत्त्वे एकसाथ कशाप्रकारे काम करतात. कारण, अनेक विद्वानांचे म्हणणे आहे की, हे जोखमीचे मिश्रण आहे.

२०१०च्या एका अभ्यासानुसार समोर आले आहे की, शुगर फ्री एनर्जी ड्रिंकमुळे हृदयावर परिणाम होण्याची शक्यता वाढते. इतर संशोधनांमध्ये समोर आले आहे की, ड्रिंक्सच्या प्रभावाने मुलांना एकाग्रतेत अडचणी येतात. साखरयुक्त एनर्जी ड्रिंक पिणाऱ्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ड्रिंक न पिणारी मुले जास्त चपळ असल्याचे दिसूनल आले.मॉन्सटर आणि रेड बुलसारखे प्रसिद्ध ब्रँड अल्पवयीन मुलांच्या मृत्यूला जबाबदार ठरले आहेत.उत्पादने सुरक्षित असल्याचे या कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यात एक कॉफीपेक्षा जास्त कॅफीन नाही. मात्र, सोडा व कॉफीसोबत न येणाऱ्या एनर्जी ड्रिंक्समधील आरोग्यावर प्रश्नावर तज्ज्ञ चिंतीत आहेत. मेरीलँड विद्यापीठातील अमेलिया अरिया म्हणाले, एनर्जी ड्रिंक्ससंदर्भात संशोधक आणि डॉक्टर चिंतेत आहेत.

एनर्जी ड्रिंक कंपन्यांना आपलेे प्राॅडक्ट बाजारात आणण्यापूर्वी एफडीएची परवानगी घेणे गरजेचे नाही. एनर्जी ड्रिंक्सचा अभ्यास कठीण आहे, कारण त्यात मिसळण्यात येणाऱ्या घटकांची पूर्ण माहिती कंपनी मालकाकडे असते. संशोधकांना माहिती नाही की कॅन किंवा बाटलीत कोणत्या घटकाची किती मात्रा आहे.

टाइमला माहिती अधिकारांतर्गत माहिती मिळाली आहे की, जानेवारी २०१२ ते नोव्हेंबर २०१४ पर्यंत एफडीएला एनर्जी ड्रिंक कंपन्यांकडून २२४ अनुकूल अहवाल मिळाले आहेत. या कंपन्यांमध्ये, फाइव ऑवर एनर्जी, फुल थ्रॉटल, जोल्ट एनर्जी ड्रिंक, मॉन्सटर एनर्जी, नोज, रेड बुल, रॉकस्टार, एएमपी एनर्जी आणि वेनम एनर्जी. सहा अहवालांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे उल्लेख आहे. एनर्जी ड्रिंक व अन्य पेय निर्मात्यांच्या इच्छेनुसार असा अहवाल द्यावा लागतो. एनर्जी ड्रिंक कंपन्यांची प्रतिनिधी कंपनी अमेरिकन बीवरेज असोसिएशनचे म्हणणे आहे की, अशा अनेक उत्पादनांमध्ये मुलांसाठी, गर्भवती किंवा आजारी महिलांसाठी किंवा कॅफीनचा धोका असलेल्या व्यक्तींसाठी धोक्याची सूचना असते. रेड बुल, मॉन्सटर आणि अन्य कंपन्यांनी टाइमला सांगितले की, ते लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून आपल्या उत्पादनाचे विपणन करत नाहीत. मात्र, टीकाकार या विधानावर समाधानी नाहीत. उदाहरण, मॉन्सटर कंपनी मॉन्सटर आर्मी नावाची सोशल नेटवर्किंग साइट चालवते. साइटवर मुले आणि तरुण मॉन्स्टरचे कपडे, डिव्हाइससह स्केटबोर्डिंगसारखे प्रताप करताना फोटो पोस्ट करतात.

कशामुळे एनर्जी ड्रिंक्समध्ये ऊर्जा येते
अनेक एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफीनशिवाय काही इतर घटक असतात. ज्याद्वारे लोकांमध्ये जोश निर्माण होऊ शकतो. यात मिसळण्यात येणारी आयुर्वेदिक औषधे आणि घटकांबाबत जाणून घ्या पुढील स्लाइडवर...