आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगळी वाट: ७६ वर्षीय अभियंता संगीत सेवेचे उपासक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर. टी. चारी, तंत्रज्ञ
वय- ७६
शिक्षण - गुइंडीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून पदवी
कुटुंब - पत्नी रांगी
चर्चेत - त्यांनी संगीतासाठी एका डिटोरियमची स्थापना केली.


व्यावसायिक उद्देश समोर न ठेवता एखादा व्यक्ती सभागृह स्थापन करू शकेल, याची कोणी कल्पना करू शकतो काय? कदाचित याचे नकारार्थीच उत्तर येईल. मात्र, चारी यांनी संगीत सेवेसाठी हे धाडस केले आहे. एका मध्यमवर्गीय अय्यंगार कुटुंबातील हे पाचवे अपत्य. कुटुंबाची बेताची आर्थिक स्थिती होती. लहानपणी डिक्सलेसियाच्या आजारपणामुळे त्यांची अन्य चार भावांशी तुलना होत असे. त्यामुळे काहीतरी करून दाखवलेच पाहिजे, असे त्यांनी त्या वेळी ठरवले. शाळेत मुख्याध्यापकाला मुलगा उंच वाटल्याने त्याला खेळासाठी चालना दिली. परिणामी, चारी उंच उडी आणि व्हॉलीबॉलमध्ये अव्वल राहिले.

खेळात यश मिळाल्यानंतर अभ्यासाचीही गोडी लागल्याने लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांना आता कोणी चिडवत नव्हते. अभियांत्रिकी महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांना ७०० रुपये प्रतिमाह नोकरी मिळाली. शेषाशायी ग्रुपमध्ये चारी यांनी वेगवान प्रगती केली. १९७१ मध्ये त्यांचे रांगी यांच्याशी लग्न झाले. विवाहाच्या दोन आठवड्यांनंतर कंपनीकडून त्यांना जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. मायदेशी परतल्यावर कंपनीत त्यांच्याविरुद्ध राजकारण होऊ लागल्याने त्यांनी अखेर भावासोबत टीएजी कॉर्पोरेशन नावाची कंपनी स्थापन केली. "टी'मध्ये त्यांच्या गावाचे नाव आणि "जी'मध्ये त्यांच्या भावाचे नाव आहे. याच काळात त्यांचा कल शास्त्रीय संगीताकडे वळला. चाळिशीपर्यंत बऱ्यापैकी यश प्राप्त करणाऱ्या या व्यक्तीने संगीत सेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले. काही कार्यक्रमांत सहभागी झाल्यानंतर संगीताची कमी जाण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी याला आव्हान म्हणून स्वीकारत हळूहळू एकेका रागाचा बारकाईने अभ्यास केला. तीन वर्षांच्या अभ्यासात त्यांना राग आणि त्याची गायकी सहज समजू लागली. मात्र, ते एवढ्यावर थांबले नाहीत. संगीताची आवड असणाऱ्या लोकांसाठी त्यांनी एक ग्रुप स्थापन केला. सुरुवातीस केवळ दहा लोक सहभागी झाले होते आणि आज तीन वर्षांपासून हा ग्रुप काम करत आहे. ४० वर्षांमध्ये त्यांनी विविध कंसर्टमध्ये ९००० तासांचे संगीत रेकॉर्ड केले आहे. या रेकॉर्डिंगमुळे तरुणांना नवे राग शिकण्यासाठी प्रेरणा मिळते.