आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरातील कारच्या शर्यतींना यांनी दिले नवे परिमाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वयाच्या दहाव्या वर्षी इंजो यांना प्रथमच बोलोग्नामध्ये कार शर्यत पाहण्याची संधी मिळाली. त्याचवेळी त्यांनी रेसिंग कारचालक होण्याचा निश्चय केला. इंजो पहिल्या महायुद्धावेळीइटलीच्या लष्करात होते. ते फ्लूने आजारी पडल्यामुळे लष्कराने त्यांना काढून टाकले. सन १९१६ मध्ये त्यांचे वडील व भावाचा फ्लूमुळे मृत्यू झाला होता. जेव्हा ते आपल्या मोडेना येथील घरी परतले. तेव्हा युद्धात त्यांची शेती पूर्णत उद्ध्वस्त झालेली होती. त्यांनी सीएमएन नामक एका
छोट्या कार कंपनीत नोकरी पत्करली.या कंपनीत इंजो यांनी आपल्या कार शर्यतीच्या कारकीर्दीस सुरुवात केली. त्याच कालावधीत त्यांची भेट युरोपातील तत्कालीन प्रसिद्ध कारचालक अल्फा रोमियोशी झाली. त्यांनी इंजो यांना संधी दिली. सन १९२३मध्ये रवेन्नाच्या कार शर्यतीत इंजो यांनी सर्वप्रथम यशाची चव चाखली.

सन १९२९ मध्ये अल्फा यांनी इंजो यांना कार रेसिंग चमू तयार करण्यास सांगितले. त्या वेळी इंजो फेरारी यांनी ४० पेक्षा अधिक चालकांची फौजच उभी केली. सन १९३५ मध्ये इंजोच्या संघाने जर्मन ग्रां प्री शर्यत जिंकली होती. या विजयामुळे अल्फा आणि इंजो यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. १९३७ मध्ये अल्फा यांनी कार शर्यतीचे सर्व अधिकार आपल्याकडे एकवटून घेतले आणि इंजो यांचे पंख छाटून त्यांची बोळवण केवळ स्पोर्ट डायरेक्टर पदावर केली. त्यामुळे नाराज इंजो यांनी कंपनीच सोडली. कंपनी सोबतच्या करारानुसार इंजो पुढील चार वर्षे इंजो कार डिझाइन करू शकत नव्हते अथवा कार शर्यतीतही सहभागी होऊ शकत नव्हते. कराराचा कालावधी पूर्ण होताच सन १९४० मध्ये फेरारी यांनी मिल मिग्लिया आणि लोटारियो रांगोनी या दोन कारची निर्मिती केली.

हा दुसर्‍या महायुद्धाचा काळ होता आणि मित्र राष्ट्रांच्या सैन्याने इंजो यांचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. त्यांनी मोडेना शहर सोडून मारानेलो गाठले. महायुद्ध संपताच सन १९४७ मध्ये इंजो यांनी फेरारी एस.पी.ए या नावाची कंपनी स्थापन केली. त्यानंतर इंजो फेरारी आणि कार रेसिंग म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या. सन १९५७ मध्ये फेरारी कारचे टायर फुटल्याने शर्यतीच्यावेळी ११ जण ठार झाले. इंजो यांच्यावर खटला भरला. या खटल्यातून ते निर्दोष सुटले. १९५० ते ६० च्या दशकात फॉर्म्यूला वन कार शर्यतीमधील विजयानंतर फेरारीची कीर्ती जगभरात पसरली.

१९७१ मध्ये त्यांनी व्यवस्थापकीय संचालकाचे पद सोडले व सन १९७४ मध्ये इंजो यांनी निवृत्ती पत्करली. इंजो यांचे व्यवस्थापन अत्यंत कठोर होते. परंतु कार शर्यतीला त्यांनी वेगळ आयाम दिला.
- इंजो फेरारी| , संस्थापक, फेरारी स्पोर्ट‌्स कार कंपनी