आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेच्या दिवशी कल्पना केल्याने वाढेल आत्मविश्वास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परीक्षा जवळ आल्या आहेत. मुले व पालकांच्या चेह-यांवर ताण दिसून येत आहे. मुलांची तणावातून सुटका होण्यासाठी एक्झाम-स्ट्रेस स्ट्रॅटेजीची माहिती घेऊया. या स्ट्रॅटेजीचे पालन केल्यास मुले ताणावर यशस्वीरीत्या मात करतील. परीक्षेचा निकालही चांगला लागेल.

त्यासाठी दोन पद्धती आहेत. पहिली, मुलांना स्मार्ट लर्निंग स्ट्रॅटेजी डेव्हलप करण्यासाठी साहाय्य करा. त्यांना क्रिएटिव्ह लर्निंगची सवय लावा. मोठ्याने वाचणे, इतरांना शिकवणे, ब्रेनस्टॉर्मिंग, रेकॉर्ड करून ऐकणे, हायलायटिंग, माइंड मॅपिंग, नोट मेकिंग, चालताना वाचणे, चेंडू खेळताना वाचणे अशा अ‍ॅक्टिव्ह लर्निंग मेथडचा फायदा होईल. अभ्यास करताना मुलांना ब्रेक घेऊ द्या. काही मुलांना दर तासाला ब्रेकची आवश्यकता असते. काही मुले तासन्तास अभ्यास केल्यानंतर ब्रेक घेतात. ब्रेकमुळे शरीरात ऊर्जेचा संचार होतो. या दरम्यान हाय प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेट डाएट, जॉगिंग वगैरेमुळे मेंदू फ्रेश होतो. कमी वेळेत गोष्टी लक्षात राहतात. कुटुंबीयांसह बाहेर जेवायला जाणे किंवा आवडती टीव्ही मालिका पाहिल्यानेही अवघड विषय लक्षात ठेवणे सोपे जाते. मुलांसोबत बसून डिस्ट्रॅक्शन लिस्ट बनवा. यात टीव्ही, मोबाइल फोन, गेम कन्सोल, म्यूझिक प्लेयर, ट्विटर-फेसबुकचा समावेश असेल. मुले तुमच्यावर दडपण आणू पाहतील की, मल्टिटास्किंग सोपे असते. मात्र, तो भ्रम आहे.

परीक्षेपूर्वी मुलांना परीक्षेच्या दिवसाची कल्पना करायला सांगा. ते आत्मविश्वासाने प्रश्नांची उत्तरे लिहीत आहेत, असे दृश्य पाहायला सांगा. संशोधनातून सिद्ध झाले आहे की, कल्पना केल्याने मेंदूला सकारात्मक कामासाठी तयार करता येते. मुलांनी पुरेशी झोप घ्यावी. न्याहारीत हाय-प्रोटीन डाएट घ्यावे. मुलांसोबत बसून समस्यांवर चर्चा करा. त्यांच्याबरोबर स्टडी शेड्यूल बनवा व तो पालन करण्यात त्यांना मदत करा. परीक्षेदरम्यान वातावरण गंभीर बनवू नका. लाइट मूड ठेवल्यास मुलांना चांगले वाटेल. त्यांच्यासोबत हसा-खेळा, जेवण करा, सोबत टीव्ही पाहा, संगीत ऐका. मुले जितकी आनंदी राहतील तितकी चांगली कामगिरी करतील. मुलांसोबत नरमाईने वागा. त्यांचे चारित्र्य घडवा. ग्रेड वा मार्कांकडे फार लक्ष देऊ नका. - प्रिव्हेन्शन नियतकालिकातून

डॉ. शैलजा सेन
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, फॅमिली थेरपिस्ट ट्रेनर, नवी दिल्ली